Tarun Bharat

शेतक-यांनी मोबाईल ऍपद्वारे पीकसर्व्हे करावा

T

वार्ताहर/जमखंडी :

यंदाच्या हंगामापासून शेतकऱयांना आपल्या पिकाचा सर्व्हे मोबाईल ऍपद्वारे करावा लागणार आहे. याची मुदत 24 ऑगस्टपर्यंत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. के. राजेंद्र यांनी दिली. जिल्हाधिकारी सभागृहात पीकसर्व्हे कामाबाबत आयोजित अधिकाऱयांच्या बैठकीत ते बोलत होते.

 जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, शेतकऱयांनी मोबाईल ऍप डाऊनलोड करून त्यात शेताचा सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर व पिकाची माहिती अपलोड करावी. यासाठी गावातील सुशिक्षित युवकांनी शेतकऱयांना मदत करावी. नैसर्गिक आपत्ती ओढविल्यास या माहितीच्या आधारे शेतकऱयांना मदत करण्यास अनुकूल होणार आहे. प्रत्येक तीन दिवसांनी नोडल अधिकारी याची माहिती घेणार आहेत. पीक सर्व्हेचे काम वेळत पूर्ण करण्याची जबाबदारी तहसीलदारांची आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी कृषी अधिकारी, महसूल निरीक्षक, तलाठी, बागायत व रेशीम खात्याच्या अधिकाऱयांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

 यावेळी जि. पं. मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी टी. भूबालन, अप्पर जिल्हाधिकारी महादेव मरगी, जिल्हा कृषी उपनिर्देशिका चेतना पाटील, उपनिर्देशक कोंगवाड आदी उपस्थित होते. 

Related Stories

टिळकवाडी पहिल्या रेल्वेगेटजवळील बॅरिकेड्स हटविण्यासाठी आंदोलन

Amit Kulkarni

सीमालढय़ावरील पुस्तकाचे 27 रोजी मुंबईत प्रकाशन

Patil_p

मळेकरणी हायस्कूलचा क्रीडा महोत्सव थाटात

Amit Kulkarni

बालिका आदर्श विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती

Amit Kulkarni

चार दिवसांनंतर सुरू झाल्या बँका

Amit Kulkarni

जि.पं.च्या निधीत कोणाचाही हस्तक्षेप नको

Amit Kulkarni