Tarun Bharat

शेतकऱयांनी शेतीकडे उद्योगाच्या दृष्टीने पहावे यासाठी सरकारचे प्रयत्न

प्रतिनिधी/ मडगाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच शेतकऱयांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिलेले आहे. त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्र्यी डॉ. प्रमोद सावंत यांनीही शेतकऱयांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य दिलेले आहे. ज्या शेतकऱयांना कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले तर त्यांना शेतकरी आधार निधीअंतर्गत सहायता करण्याचे काम सरकारतर्फे केले जाते. राज्याची आर्थिक स्थिती कमजोर असतानाही सरकारने शेतकऱयांना कुठेही कमी पडू दिलेले नाही, असे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी सांगितले.

मडगाव येथील दक्षिण गोवा कृषी केंद्रामध्ये जागतिक अन्न दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषीखात्याचे संचालक नेवील आफान्सो, कृषी अधिकारी चंद्रहास देसाई व इतर उपस्थित होते.

मागच्या वर्षापेक्षा यंदा जास्तीत जास्त शेतकरी शेतीकडे वळलेले आहेत. शेतकऱयांनी शेतीकडे आता व्यवसाय या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारचा पाठिंबा नेहमीच शेतकऱयांना असेल. तसेच शेतीकडे वळून शेतकऱयांची आर्थिक परिस्थिती मजबूत बनविण्यासाठी प्रयत्न असेल. जनतेला कोरोनापासून मुक्त करण्यासाठी कुणालाही यश आलेले नाही. त्यामुळे प्रत्येकाने चांगले पदार्थ खाऊन स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. कवळेकर म्हणाले.

जागतिक अन्न दिनानिमित्त आज पंतप्रधान मोदी यांनी रुपये 75 नाण्याचे अनावरण केलेले आहे. तसेच प्रत्येकाने जिथे जागा उपलब्ध आहे तिथे भाजीपाल्याची लागवड करावी. कारण स्वतःला बाजारात जाण्याची गरज भासणार नाही. इतर राज्यातून येणाऱया भाजीपाल्यावरही आपल्याला अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. प्रत्येकाने स्वतःला आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न करावा. रानटी जनावरांकडून शेतकऱयांचे नुकसान होण्यापासून वाचविण्यासाठी त्यांना फॅन्सी कुंपण घालण्यासाठी अनुदान दिले जाईल, असे श्री. कवळेकर यांनी सांगितले.

Related Stories

रमेश तवडकर यांना 28 रोजी शिक्षा

Patil_p

कोलवा किनाऱयावर सिल्वर सेंड हॉटेलचा भाग पाडा

Amit Kulkarni

फातोर्डा अपघात: महिलेचा पाय मोडला

Amit Kulkarni

गोव्यातील खाणींवर 15 दिवसात तोडगा

Omkar B

विजय – दिगंबरने पिंपळकटय़ावर केली प्रचाराची सांगता

Patil_p

कर्नाटक सरकार कार्यवाही करणार : प्रल्हाद जोशी

Patil_p