Tarun Bharat

शेतकऱयांसाठी भूचेतन उपक्रम सुरू करा

कर्नाटक राज्य रयत संघाची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

2008-09 साली भाजप सरकारने शेतकऱयांसाठी भूचेतन उपक्रम राबविला होता. त्यामुळे शेतकऱयांना या माध्यमातून चांगला रोजगार उपलब्ध झाला होता. मात्र, आता या उपक्रमाकडे दुर्लक्ष झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. हा उपक्रम तातडीने सुरू करावा, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघाने मंगळवारी विधानसौधसमोर आंदोलनाद्वारे केली.

जमिनीचा दर्जा टिकविण्यासाठी आणि शेती उत्पादन वाढविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा होता. मात्र, शासनाचे या उपक्रमाकडे दुर्लक्ष झाले आहे.

शेतकऱयांच्या हिताचा असणारा हा उपक्रम सुरू करावा, या उपक्रमांतर्गत साडेतीन हजार शेतकऱयांना रोजगार उपलब्ध झाला होता. मातीची गुणवत्ता टिकविण्यासाठी हा उपक्रम सुरू करावा आणि शेतकऱयांना दरमहा दहा हजार गौरवधन देण्यात यावे, अशी मागणीदेखील कर्नाटक राज्य रयत संघाने निवेदनाद्वारे केली.

Related Stories

अस्मिता एन्टरप्रायझेसच्या स्पर्धा उत्साहात

Amit Kulkarni

‘तो’ व्हिडिओ बाकनूर भागातील नव्हे

Amit Kulkarni

भात पिकावर रोगासह किडीचा प्रादुर्भाव

Patil_p

संतिबस्तवाड येथील बसवेश्वर मंदिराचा कॉलम भरणी

Amit Kulkarni

मार्गशीर्ष व्रताची श्रद्धेने सांगता

Patil_p

लोकमान्य सोसायटीची लोकमान्य नारी सन्मान ठेव योजना सुरू

Amit Kulkarni