Tarun Bharat

शेतकऱयांसाठी 15 लाख कोटींच्या कर्जाची तरतुद

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

शेतकऱयांसाठी 15 लाख कोटींच्या कर्जाची तरतुद आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आली.

2022 पर्यंत शेतकऱयांचं उत्पन्न दुप्पट करण्यावर भर दिला जाणार असून सिंचन योजनेलाही बळ देणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, शेतीमध्ये गुंतवणूक करण्यावर आम्ही भर देणार आहोत.

तसेच शेतकऱ्यांसाठी आम्ही 16 कलमी कार्यक्रम आणतो आहोत. ज्याद्वारे शेतकऱ्यांची प्रगती करणाऱ्यावर भर दिला जाईल. सौर उर्जेवर शेती पंप सुरु केले आहेत. तसेच  15 लाख शेतकऱ्यांना सोलार पंप बसवण्यासाठी आम्ही मदत करणार आहोत. त्यामुळे डिजेलचा खर्च वाचणार आहे. नापीक जमिनीवर सौर ऊर्जा उभारण्यासाठी योजना सुरु करणार. सौर ऊर्जेवर शेतीपंप सुरु करणार.

दुध, मांस-मासे वाहतुकीसाठी किसान रेल योजना राबवणार.

जिल्हास्तरावर फळबागा विकासासाठी तरतुद तर गाव स्तरावर गोदामाची निर्मिती करण्यावर भर दिला जाणार आहे, अशी घोषणाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.

Related Stories

नीटमध्ये नापास होण्याच्या भीतेने विद्यार्थिनीची आत्महत्या

Patil_p

बाबा रामदेवांच्या औषधावर निर्बंध

Patil_p

शोपियां चकमकीत दहशतवाद्याला कंठस्नान

datta jadhav

भारत-पाक सीमेवर 40 किलो हेरॉइन जप्त

datta jadhav

सध्याच निवडणुका घेतल्यास मोदींची हॅट्ट्रिक

Patil_p

झाडांच्या संगे दिवाळी

Patil_p