Tarun Bharat

शेतकऱ्यांना लुटण्याचा अर्थपूर्ण व्यवहार थांबवावा अन्यथा झोडपून काढू : संदिप राजोबा

भिलवडी प्रतिनिधी

भिलवडी ऊस पट्टयात साखर कारखान्याचे स्लिप बॉय व ऊस तोडणीदारांचा मनमानी कारभार सुरू आहे. याकरणाने ऊस उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. ऊस कारखान्यास घालण्यासाठी स्लिप बॉय, ऊसतोडणी मुकादम यांची ऐनकेन प्रकारे मनधरणी करून खुश करण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत.

भिलवडी, ब्रम्हनाळ, खटाव, वसगडे, सुखवाडी, चोपडेवाडी, माळवाडी, खंडोबाचीवाडी, अंकलखोप ऊसपट्टयात तोडणीची धांदल सुरू आहे. कारखाने सुरु झाल्यावर अवकाळी पावसाने हजेरी लावली. या कारणाने ऊस तोडी लांबल्या. याचा परिणाम वेळेत ऊस तुटण्यावर झाला. मार्च महिना आला तरी तोडी मिळेनात. ऊस उत्पादक शेतकरी गट ऑफिसमध्ये हेलपाटे मारून थकले. नेमका याचाच फायदा घेत गट ऑफिस सह वरिष्ठांची साखळी कार्यरत झाल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये रंगली आहे. प्रोग्रॅमनुसार तोड न देता अधिकाऱ्यांना हाताशी धरून स्लिप बॉय व तोडणी मुकादमांचा मनमानी कारभार सुरू आहे. स्लिप बॉय, ऊसतोडणी मुकादम व गट कार्यालयातील अधिकारी यांची ऐनकेन प्रकारे मनधरणी करून खुश केल्यावर ऊसाला कोयता लागत आहे. ऊसतोडणी मशीन करता तीन हजार पासून सात हजार पर्यंत मोजावे लागत आहेत. तसेच वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हरला एन्ट्री वेगळी असल्याची ऊस उत्पादकांची तक्रार आहे. नाईलाजास्तव शेतकरी वर्ग ऊस घालवण्यासाठी मनस्ताप सहन करत आहे. आर्थिक झळ सोसत आहे.

शेतकऱ्यांच्या हतबलतेचा गैरफायदा घेत लुटण्याचा धंदा सुरू आहे. काही टोळी मालकांकडून ऊस पळवण्यासाठी फड जाळण्यायाचे प्रकार सुरू आहेत. स्लिपबॉय, मुकादमांनी गैरप्रकार थांबवावेत अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना झोडपून काढेल. वेळीच सदर प्रकार थांबवा. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे पासून गाढवावरून धिंड काढून असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिला आहे

Related Stories

गझलकार इलाही जमादार यांचे निधन

Archana Banage

स्वाभिमानीची आज ऊस परिषद

Archana Banage

सर्वपक्षीय बैठकीत भोंग्यांबाबत काय निर्णय झाला?

datta jadhav

पिरनवाडी येथे टँकरच्या धडकेत वृद्ध ठार

mithun mane

सांगली : प्रत्येक मतदाराचे तापमान तपासून मतदान

Archana Banage

राजू शेट्टींच्या जलसमाधी यात्रेची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

Archana Banage