Tarun Bharat

शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त व नियोजन बद्ध शेती करावी – डॉ. कसपटे

प्रतिनिधी / बार्शी

माती हवामान उपलब्ध पाणी यांचा अभ्यास करून शास्त्रोक्त पद्धतीने व नियोजनबद्ध शेती केल्यास शेतकऱ्यांना यश मिळते. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यातक्षम उत्पादने बनवावीत असे आवाहन केंद्रीय पुरस्कार विजेते, प्रगतिशील शेतकरी एन एम के वन जातीच्या सिताफळाचे संशोधक डॉ. नानासाहेब कसपटे यांनी केले.

राष्ट्रीय किसान दिनानिमित्त मधुबन फार्म अॅड नर्सरी व अखिल भारतीय सीताफळ महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी मेळावा व चर्चासत्रात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रगतिशील महिला शेतकरी सपना मगर व विश्वनाथ देवरमी उपस्थित होते. यावेळी डॉ. कसपटे यांनी लागवड कशी करायची , रोपांमधील अंतर, रोपांचे संगोपन कसे ,छाटणी कशी करायची, पाण्याचे व्यवस्थापन, मृगबहर ,खत व्यवस्थापन, फळे तोडणी, ग्रेडिंग, पॅकेजिंग याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.

यावेळी बोलताना माळशिरस च्या सपना मगर यांनी दीड एकर क्षेत्रामध्ये सीताफळाचे उत्पादन घेऊन साडेदहा लाख रुपये नफा कसा मिळवला हे सांगत आपल्या यशोगाथेमध्ये आलेल्या अडचणी व त्यावर केलेली उपाययोजना याचे वर्णन केले .यावेळी बोलताना अक्कलकोटचे विश्वनाथ देवरमी यांनी सेंद्रिय शेती ,डिकंपोजर, जिवाणू कल्चर या विषयी माहिती दिली .

रवींद्र कसपटे यांनी कीड रोग व्यवस्थापन या विषयावर माहिती देताना फळमाशी ,रस शोषक किडे यावरील लक्षणे आणि नियंत्रण याबाबत शेतकऱ्यांचे मार्गदर्शन केले त्यानंतर प्रवीण कसपटे यांनी गोरमाळे येथे दोन कोटी रुपये खर्चाचा दहा एकर क्षेत्रामध्ये सीताफळ लागवडीचा व संशोधन प्रकल्प सुरु असल्याचे सांगितले. या प्रकल्पामध्ये सीताफळाच्या 2500 जातींवर संशोधन सुरू असल्याचीही माहिती दिली .मेळाव्यानंतर शेतकऱ्यांना शिवारफेरी घडवून सीताफळांच्या विकसनाच्या विविध टप्प्यांची माहिती देण्यात आली .या मेळाव्याला पालघर, बीड-,लातूर, परभणी, जालना ,पुणे , ,नांदेड, वसमत येथून आलेले शेतकरी उपस्थित होते. सर्व शेतकऱ्यांच्या भोजनाची सोय मोफत करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ जगताप यांनी केले तर आभार प्रवीण कसपटे यांनी मानले.

Related Stories

विनापरवाना मुरूम वापरल्याने 3 कोटी 4 लाखाचा दंड

Abhijeet Khandekar

माकपने शहरात विविध ठिकाणी पाळला राष्ट्रीय निषेध दिन

Archana Banage

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रात्री ९ पर्यंत ठिय्या आंदोलन

Archana Banage

सोलापुरात आणखी पाच नवीन कोरोना रुग्ण; संख्या 30 वर

Archana Banage

सोलापूर : बार्शी नगर परिषदेच्या दवाखाना आणि शॉपिंग सेंटरचे भूमिपूजन

Archana Banage

सोलापूर ग्रामीणमध्ये २४४ रुग्ण कोरोनामुक्त

Archana Banage