Tarun Bharat

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; खत दरवाढ अखेर मागे

Advertisements

ऑनलाईन टीम

मान्सूनचे वेध लागले असतानाच शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने खतांची दरवाढ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. खतांवरील सबसिडीमध्ये केंद्राने 140 टक्क्यांची वाढ केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्च स्तरीय बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

शेतकऱ्यांना आता खताच्या पिशवीवर 500 ऐवजी 1200 रुपये सबसिडी मिळणार आहे. त्यामुळे 2400 रुपयांची खताची पिशवी सेतकऱ्यांना 1200 रुपयांना मिळणार आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत खतांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होता. तसेच काँग्रेससह विरोधी पक्षांनीही केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. खतांच्या किमतीत 700 रुपयांपर्यंत वाढ करून शेतकऱ्यांना गुलाम बनवण्याचे केंद्राचे धोरण असल्याचे विरोधकांनी आरोप केले होते. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही खतांची दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता.

Related Stories

गतीशक्ती’ राष्ट्रीय योजनेचे उद्घाटन

Patil_p

हरियाणामध्ये गेल्या 24 तासात 694 नवे कोरोना रुग्ण; एकूण संख्या 26,858

Rohan_P

जैश ए मोहम्मदच्या म्होरक्याला कंठस्नान

Patil_p

हुतात्मा स्मारकाचे पूर्णतः राष्ट्रीय युद्ध स्मारकाशी एकत्रिकरण

Patil_p

उत्तराखंडात कोरोनाग्रस्तांची संख्या 10 हजाराच्या उंबरठ्यावर

Rohan_P

शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यास अमित शाह सहमत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!