Tarun Bharat

शेतकऱ्याला शब्द आणि आमदारांचा स्वःखर्च

गोडोली/ प्रतिनिधी

वडूथ गाव बागायतदार असून पाणंद रस्ते नसल्याने मोठ्या अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. ही बाब आमदार महेश शिंदे यांना एका सामान्य शेतकऱ्यांने सांगताच “चला उद्याच कामाचा शुभारंभ करु या, “असा शब्द दिला आणि जरंडेश्वर रस्ता आणि चीलूबाई देवस्थान मुख्य पाणंद रस्त्यांच्या प्रत्यक्ष स्वःखर्चातून कामाला सुरुवात केली.

वडूथ गावातील पाणंद रस्ते सोईस्कर नसल्याने शेतकऱ्यांना शेतातील माल वाहतूक करणे अवघड जाते. कित्येक वर्षांचा प्रश्न आजवरच्या एकाही नेत्याने मागणी करूनही सोडवला नाही. मात्र एका सामान्य शेतकऱ्यांने आमदारांना सहज विषय सांगितला आणि दुसऱ्याच दिवशी स्व:खर्चाने जरंडेश्वर रस्ता आणि चीलूबाई देवस्थानाकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करुन शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला. यावेळी सरपंच किशोर शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष साबळे, बबन साबळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

खा. उदयनराजेंनी वढु बुद्रुक येथे संभाजी महाराजांना केले अभिवादन

datta jadhav

साताऱ्यात खुलेआम गुटखा विक्री

datta jadhav

बार्शीत शालेय पोषण आहारातील ११० टन तांदूळ झाला वाटप

Archana Banage

कोरेगाव तालुक्यातील भाडळेत विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Archana Banage

तब्बल दीड वर्षाने दुकाने 10 पर्यंत खुली

datta jadhav

गवत पेटवताना भाजून वृध्देचा जागीच मृत्यू

Patil_p