Tarun Bharat

शेतीच्या बांधावरुन दोन गटात हाणामारी; ८ जण जखमी

१३ जणांवर गुन्हा दाखल

Advertisements

कुर्डुवाडी/प्रतिनिधी

शेतीच्या बांधावरुन दोनगटात लोखंडी कोयता, तलवार, काठी, लोखंडी राॅड, दगडाने झालेल्या हाणामारीत ८ जण जखमी झाले आहेत. दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रार कुर्डुवाडी पोलिसांत दाखल केली असून दोन्हीगटातीली एकूण १३ जणांवर परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. १२ रोजी स.११ वा सुमारास पडसाळी ता.माढा येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिला फिर्यादी राजाराम किशन जाधव रा. पडसाळी ता. माढा हे त्यांच्या शेतातील कांदा पिकाची काढणी करताना त्याच्या शेता शेजारील ज्ञानदेव अंबादास सलगर हा त्याच्या शेतात ट्र‌ॅक्टरने नांगरणी करीत असताना फिर्यादीचा बांध फोडला.फिर्यादीने बांध का फोडला अशी विचारणा केली असता ज्ञानदेव अंबादास सलगर, रमेश सुभाष सलगर, सुरेश ज्ञानदेव सलगर,रणजित सुरेश सलगर, मनिषा सुरेश सलगर, विमल सुरेश सलगर, गणेश बाळासाहेब सलगर सर्व रा. पडसाळी तालुका माढा यांनी संगनमत करुन फिर्यादीचे पत्नीस व मुलांना वरील हत्याराने व लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ व दमदाटी केली.

तर दुसरा फिर्यादी सुरेश ज्ञानदेव सलगर याने परस्पर विरोधी पोलिसांत तक्रार दाखल केली असून सलगर यांच्या फिर्यादीवरुन राजाराम किसन जाधव, रोहन राजाराम जाधव, आकाश राजाराम जाधव, नितीन बाळासाहेब जाधव , भाग्यश्री राजाराम जाधव, पूजा नितीन जाधव सर्व रा. पडसाळी तालुका माढा यांनी शेतीच्या बांध फोडण्याच्या कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळी करून धमकी देऊन वरील हत्याराने मारहाण करून फिर्यादी, फिर्यादीचा मुलगा, चुलत भाऊ, वडील व पत्नी यांना गंभीर जखमी केले आहे. यांच्याविरूद्ध कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तपास पो. हे. काँ. नितीन गोरे हे करीत आहेत.

Related Stories

टाटांनी आजवर समाज हिताची कामे केली – पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते

Abhijeet Khandekar

एम.आय.डी.सी. बाबत पंधरा वर्षे रखडलेले अडथळे दूर करणार – उद्योगमंत्री तटकरे

Archana Banage

भाजपा खासदार जयसिद्धेश्वर महास्वामींवर गुन्हा दाखल

Archana Banage

दरोड्यात लुटलेले 546 सोयाबीनचे पोते पोलीसांकडून जप्त

Abhijeet Khandekar

पोपटाला बंदिस्त करणे पडले महागात; न्यायालयाने ठोठावला 25 हजाराचा दंड

prashant_c

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे 13 बळी, 314 नवे रुग्ण

Archana Banage
error: Content is protected !!