Tarun Bharat

शेतीपंपाच्या वीजबिलाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

देशमुखनगर / वार्ताहर :

सातारा जिल्ह्यात शेतीपंपाचे मीटर रिडींग न घेता अंदाजाने अव्वाच्या सव्वा बिले आकारून महावितरण कंपनीकडून चुकीच्या पद्धतीने बिलांची वसुली चालू आहे. याबाबत लोकप्रतिनिधी व प्रशासन कानावर हात ठेवुन आहेत. लूटमारीचा हा धंदा महावितरण कंपनीने बंद न केल्यास शेतीपंपाच्या बेकादेशीर वीजबिलाविरोधात कायदेशीर लढण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार वेणेगाव तालुका सातारा येथील शेतकरी मेळाव्यात करण्यात आला.

या मेळाव्यास उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांच्या बोकांडी कशा पद्धतीने खोटी बिले तयार करून मोठ्या रकमेची वसुली करण्यासाठी ठेकेदार पद्धतीने काम करणाऱ्या लोकांच्या कडून जुलमी पद्धतीने वसुली करण्याचा लुटमारीचा धंदा सुरू करून सामान्य शेतकऱ्याला आर्थिक अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालवलेला आहे.

महाविरणने विद्युत बिले तयार करताना कोणत्याही प्रकारचा कायदेशीर आधार न घेता बिले तयार केली आहेत व ज्यादा रकमेची बिले कमी करून पुन्हा नव्या जोमाने अधिक वाढ करून पुन्हा पुन्हा तेच नाटक सुरू ठेवले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन लढा देणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक गाव निहाय बैठकांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

या शेतकरी मेळाव्यास वेणेगावचे युवा शेतकरी तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

सातारा : अन्यथा पालिकेसमोर आंदोलन छेडू

Archana Banage

पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांसी ‘जय महाराष्ट्र’, रामदास कदमांनीही साथ सोडली

Rahul Gadkar

खेड येथून दोन लाख रुपयांचे दागिने लंपास

Patil_p

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी एकास सक्तमजुरी

Amit Kulkarni

आरटीओ आवारातून वाहन पळवून नेणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

Abhijeet Khandekar

महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात मनोज कदम, ऋषिकेश देशमुख

Amit Kulkarni