Tarun Bharat

शेती क्षेत्रात 2.5 टक्क्मयांच्या वृद्धीचे संकेत

Advertisements

क्रिसिलच्या अहवालात स्पष्टीकरण : बागायती उत्पादना संदर्भात काळजी

वृत्तसंस्था/ मुंबई

कोरोना विषाणुच्या महामारीमुळे विविध क्षेत्रांचा विकासाचा वेग मंदावला आहे. परंतु साऱया जगाचा पोशिंदा असणाऱया शेती क्षेत्रातून मात्र उद्योगाला चालना देण्यासाठी आगामी काळात सकारात्मक कामगिरी कर दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. कृषी वर्ष 2020-21 या कालावधीच्या दरम्यान कृषी क्षेत्रात 2.5 टक्के वृद्धी नोंदवली जाणार असल्याचा अंदाज क्रिसिल रिसर्च अहवालातून देण्यात आला आहे.

शेती क्षेत्रातील होणाऱया टोळ धाडीचा हल्ल्याचे संकेत आणि बागायती उत्पादनावर होणारा लॉकडाऊनचा प्रभाव यामुळे काहीशा प्रमाणात शेती उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे. परंतु महामारी आणि लॉकडाऊन समाप्त होताच खाद्याअन्नाच्या तुलनेत बागायती उत्पादनाच्या मागणीवर मोठय़ा प्रभाव राहणार असल्याची निरिक्षणे या अहवालातून दिली आहेत.

सरकारने 14 खरीप पिकांसाठी एमएसपीच्या वाढीची घोषणा केली आहे. ज्यामध्ये शेतकरी त्यांच्या उत्पादनातून 50 ते 83 टक्क्मयांपर्यंत लाभ मिळवण्याची शक्मयता आहे. कारण बागायती उत्पादने ही लवकर नाश पावणारी असतात. त्यामुळे त्याची शेतीमधून बाजारापेठेपर्यंत उत्पादन घेऊन जाईपर्यंत मोठी कसरत शेतकऱयांना करावी लागत असून त्यांच्या वृद्धी संदर्भात शंका उपस्थित केली आहे.

Related Stories

स्कोडा ऑटो इंडियाचे उत्पादन सुरू

Patil_p

टाटा पॉवरचा 100 मेगावॅटचा सौरप्रकल्प सुरु

Patil_p

रस्ते अपघात कमी करण्याचे ध्येय

Patil_p

जे ली ‘सॅमसंग’चे नूतन कार्यकारी अध्यक्ष

Amit Kulkarni

लँक्सेस इंडियाची कोरोना लढाईसाठी मदत

Patil_p

सुझुकी स्मार्ट फायनान्सने दिले 6,500 कोटीपेक्षा अधिकचे कर्ज

Patil_p
error: Content is protected !!