Tarun Bharat

शेती, घराच्या वाटणीसाठी सख्या भावात वाद; शिक्षक भावाला जबर मारहाण

Advertisements

तालुका प्रतिनिधी / अक्कलकोट

शेती व घर वाटणीच्या वादातून चौघांनी मिळून शिक्षक भावास जबर मारहाण केली. अक्कलकोट तालुक्यातील गोगांव येथे ही घटना घडली. यामध्ये शिक्षक चनबसय्या गुरुमुर्ती मठपती (वय ५८) हे गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना दि ११ रोजी सायंकाळी साडेनऊ वाजता गोगाव येथील राहत्या घरासमोर घडली. याबाबत जखमी शिक्षक भावाने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, चनबसय्या मठपती हे घरी असताना त्यांचे भाऊ बसलिंगय्या मठपती, हिराबाई लिंगय्या मठपती, लिंगराज बसलिंगय्या मठपती, चंद्रकला बसलिंगय्या मठपती हे सर्वजण अचानक घरात येऊन चनबसय्या मठपती यांना म्हणाले की,”तुझे शेतजमीन व घर आम्हाला दे, तुला नोकरी आहे आणि पगार आहे, तुला कशाला शेतजमीन अन घर पाहिजे ? तुला एकटाच मुलगा आहे तू पनवेल या ठिकाणी घर बांधला आहेस मग मूळगावी असलेले घर कशाला पाहिजे ? असे म्हणून चनबसय्या यांना शिवीगाळ करून दमदाटी केली.

यावेळी चनबसय्या हे वाटणी झाल्याप्रमाणे आपल्या हिस्स्याप्रमाणे घेऊ असे सांगत होते. तेव्हा वरील चारही संशयित आरोपींनी त्यांना “तू शेत-घर कसा देत नाहीस, तुझे जीव मारून टाकल्यावर तू काय करणार आहेस ?असे म्हणत मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर आरोपींनी पाठलाग करीत चनबसय्या यांना जिवंत सोडायचे नाही याला मारून टाकू म्हणत काठीने डोक्यावर, हातावर मारून गंभीर जखमी केले. यावेळी डोक्यावर गंभीर जखमा झाल्या असून दोन्ही हाताला जबर मार लागला आहे. चनबसय्या मठपती यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा; दोघांचा बळी

Patil_p

क्लुझर वाहनाची मोटारसायकलला धडक : मामा-भाचे यांचा जागेवरच मृत्यू

Sumit Tambekar

पंढरपुरात 11लाख 17 हजाराची रोकड सापडली

Abhijeet Shinde

सोलापूर : चांदी व्यापाऱ्याला रस्त्याच गाठले मृत्यूने, साडेपाच लाखाचा ऐवज सुरक्षित

Abhijeet Shinde

सोलापुरात नवीन 9 कोरोना रुग्ण; संख्या पोहोचली 50 वर – जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

कार्तिकी वारी निर्बंधातच,दिंड्यांना पंढरपूरकडे जाण्यास मज्जाव

Abhijeet Shinde
error: Content is protected !!