Tarun Bharat

शेत नांगरताना ट्रॅक्टर खाली सापडून ड्रायव्हरचा मृत्यू

Advertisements

प्रतिनिधी / शिराळा

पाडळीवाडी ता. शिराळा येथे शेतात ट्रॅक्टरने नांगरट करत असताना, ट्रॅक्टरखाली सापडून ड्रायव्हरचा मृत्यू झाला. राहुल नारायण पाटील वय -25 वर्षे , रा.पाडळीवाडी ता . शिराळा असे मृताचे नाव आहे. याबद्दल शिराळा पोलीस ठाण्यात पांडुरंग यशवंत पाटील यांनी वर्दी दिली आहे.

शिराळा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मृत राहुल नारायण पाटील हा सागर आनंदराव पाटील यांच्या (महिंद्रा अर्जुन ट्रॅक्टर क्र . एम.एच .10 ए.वाय 2245 ) ट्रॅक्टरने नांगरट करत असताना ट्रॅक्टर खाली सापडून त्याचा मृत्यू झाला. पाडळीवाडी येथील लोक्याचा मळा येथे अर्जुन रामू पाटील यांचे शेतात रात्रीचेवेळी ट्रॅक्टरने नांगरट करीत असताना हा अपघात झाला आहे. कानातून आणि नाकातून अति रक्तश्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास सपोफौ वायदंडे करीत आहेत.

Related Stories

राज्यांना स्वतंत्र क्रीडा मंत्रालय आवश्यक – श्रीनिवास रेड्डी

Archana Banage

लहान मुलांतील एच.आय.व्ही. संसर्ग रोखण्यास यश – जिल्हाधिकारी

Archana Banage

गुढीपाडव्यासाठी बाजारपेठ सज्ज

Archana Banage

वाघुर्डे येथे दोन लहान मुलांना तर पणोरेतील महिलेला कोरोनाची लागण

Archana Banage

के.एस.ए. जिल्हा संघाची उपांत्य फेरीत धडक

Abhijeet Khandekar

Sangli : प्रहार संघटनचे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आत्मक्लेष समाधी आंदोलन

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!