Tarun Bharat

शेमारू मराठीबाणाला एक वर्ष पूर्ण

आशयघन सिनेमा जे संपूर्ण कुटुंबासोबत पाहू शकतो असे मराठी चित्रपट पाहण्याची हमखास वाहिनी अशी शेमारू मराठीबाणाची ओळख एका वर्षभरातच झाली आहे. लॉकडाउनच्या काळात जेव्हा थिएटर्स आणि मनोरंजनाची इतर ठिकाणे बंद होती तेव्हा दर्शकांच्या मनोरंजनाची काळजी वाहिनीने पुरेपूर घेतली. वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर्स आणि महामुव्ही च्या माध्यमातून निरनिराळय़ा धाटणीचे सिनेमे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवण्याचं काम शेमारू मराठीबाणा वाहिनी सातत्याने करत आहे. यामुळेच अल्पावधीतच परीक्षकांच्या मनात वाहिनीने आपले असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. या वाहिनीला एक वर्ष पूर्ण झाले आहे.

शेमारू एंटरटेनमेंट लिमिटेडचे सीईओ हिरेन गडा यांनी सांगितले, आमच्या शेमारू मराठीबाणा या मराठी चित्रपट वाहिनीचा पहिला वर्धापनदिन साजरा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही नेहमीच अतिशय अनोखा, नवा कन्टेन्ट सादर करत असतो आणि शेमारू मराठीबाणाला मिळत असलेले यश म्हणजे दर्शकांना त्यांच्यासाठी खास तयार करण्यात आलेला कन्टेन्ट दाखवण्यासाठीच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फळ आहे. दिग्गज मराठी अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते महेश कोठारे यांनी सांगितले, या सोहळ्यासाठी शेमारू मराठीबाणाने मला आमंत्रण दिले आणि कलागुणांना प्रोत्साहन देणार्या, आव्हानात्मक काळात देखील पुढे जाण्यात मदत करणाऱया समुदायाचा भाग होण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. नामवंत अभिनेत्री मफणाल कुलकर्णी म्हणाल्या, मराठी चित्रपटसफष्टी नेहमीच एकोप्याने कार्यरत आहे. आणि शेमारू एंटरटेनमेंट सारखे उद्योग समूह आम्हाला लोकप्रियतेच्या झोतात राहण्यासाठी वेगवेगळ्या संधी देत राहतात. मला खात्री आहे की, मराठी शेमारूबाणाचे यश साजरे करणारे असे अनेक सोहळे होत राहतील आणि मी आनंदाने त्यामध्ये सहभागी होईन.

अतिशय लोकप्रिय मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी सांगितले, मराठी चित्रपटसफष्टीने मला भरभरून दिले आहे आणि मी खूप खुश आहे की अशा संकटाच्या काळात देखील शेमारूने आमच्या उद्योगक्षेत्राचा गौरव कायम राखला आणि वाढवला.  शेमारूसोबत माझे संबंध गेल्या बऱयाच काळापासूनचे आहेत आणि आज त्यांच्या मराठी चित्रपट वाहिनीच्या शेमारू मराठीबाणाच्या पहिल्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात सहभागी होताना मला अतिशय आनंद होत आहे. मराठी चित्रपट आणि नाटय़क्षेत्रातील ख्यातनाम अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, मराठी चित्रपटांनी नेहमीच समफद्ध मराठी परंपरा जोपासून मराठी माणसातील कलाकौशल्यांना वाव दिला आहे. प्रेक्षकांसमोर प्रत्यक्षात कार्यक्रम सादर करणे किंवा पडद्यावर सिनेमे दाखवणे शक्य नसल्याच्या काळात देखील आम्हाला आमच्या चाहत्यांसोबत जोडून ठेवण्यात शेमारू मराठीबाणा वाहिनीने खूप मोठी साथ दिली आहे. पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मी वाहिनीचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छा व्यक्त करतो की नव्या वर्षात देखील आमच्यासोबत आणि आमच्या प्रेक्षकांसोबतची त्यांची वाटचाल सुखदायी व यशस्वी ठरो. असे ते म्हणाले.

Related Stories

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर झळकणार वेल डन बेबी

Patil_p

म्हणून विराजसचा निबंध ठरला वेगळा

Patil_p

झीनत अमान यांची बॉलिवूडमध्ये 50 वर्षे पूर्ण

Patil_p

रिद्धिला मिळाली मोठी संधी

Amit Kulkarni

पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे अक्षयने मागितली माफी

Archana Banage

‘थडम’च्या हिंदी रिमेकमध्ये मृणाल

Patil_p