वृत्तसंस्था/ मियामी
जागतिक क्रमवारीत 48 व्या स्थानावर असणाऱया अमेरिकेच्या शेल्बी रॉजर्सने आपल्याच देशाच्या अमांदा ऍनिसिमोव्हाचा पराभव करून मियामी ओपन टेनिस स्पर्धेची दुसरी फेरी गाठली.
रॉजर्सने हा सामना 3-6, 6-0, 6-3 असा जिंकला. पहिल्या सेटमध्ये ऍनिसिमोव्हाने सलग पाच ब्रेक्स मिळवित सेटही जिंकला. पण नंतरच्या दोन सेट्समध्ये शेल्बीने मुसंडी मारली. दुसऱया सेट तिने 6-0 असा एकतर्फी जिंकल्यानंतर निर्णायक सेटही जिंकून ऍनिसिमोव्हाचे आव्हान संपुष्टात आणले. तिची पुढील लढत दहाव्या मानांकित लॅटव्हियाच्या एलेना ओस्टापेन्कोशी होणार आहे. अन्य एका सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या दारिया सेव्हिलेने बेल्जियमच्या ग्रीट मिनेनचा 7-5, 6-3 असा पराभव केला. सेव्हिलेची पुढील लढत माजी अग्रमानांकित सिमोना हॅलेपशी होणार आहे.