Tarun Bharat

शेळ-मेळावली ग्रामस्थांच्या आंदोलनाला कलाटणी

पंचायतीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन : कार्यालय बंद करण्यासाठी विरोध.रात्रभर आंदोलन करणार.,उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांची मध्यस्थी अयशस्वी.

प्रतिनिधी /वाळपई

गेल्या आठवडय़ापासून सुरू असलेले शेळ मेळावली ग्रामस्था?च्या आंदोलनाला आज वेगळय़ाच प्रकारची कलाटणी मिळाली .आज सोमवारपासून पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात झाली. पंचायतीच्या कार्यालयात आंदोलकांनी ठाण मांडले होते .संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पंचायतीचे कार्यालय बंद करण्याचा प्रयत्न केला असता तो रोखून धरण्यात आला. रात्री उशिरापर्यंत आंदोलक पंचायतीच्या कार्यालयात ठाण मांडून होते .यामुळे पंचायतीचे कार्यालय बंद होऊ शकले नाही. सतरी तालुक्मयाचे उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांनी रात्री उशिरा आंदोलनकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला . मात्र तो पूर्णपणे अयशस्वी ठरला .यामुळे सदर आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले असून कार्यालय बंद करून देणार नसल्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

दरम्यान मंगळवारी गांजे या ठिकाणी म्हादई नदीवर उभारण्यात आलेल्या जलसिंचन खात्याच्या 111 कोटी खर्चून प्रकल्पाचे उद्घाटन गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आरोग्यमंत्री विश्वजित राणे व जलसंपदामंत्री फिलिप नेरी यांच्या हस्ते होणार आहे. शेळ मेळावली येथील आंदोलन रात्रभर पंचायतीच्या कार्यालयातच ठाण मांडून राहणार असून उद्या सकाळी सदर कार्यक्रमाच्यास्थानी जाण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही .तसे झाल्यास तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गेल्या आठवडय़ापासून आंदोलन सुरू.

यासंदर्भाची माहिती अशी की गोवा सरकारतर्फे साडेतीन हजार कोटी खर्चून मेळावली या ठिकाणी आयआयटी प्रकल्प उभारण्यात येणार होता. मात्र या प्रकल्पाला जोरदार विरोध करण्यात आल्यानंतर सरकारने सदर प्रकल्प या भागातून इतरत्र स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला .

शेळ मेळावली भागातील लाखो चौरस मीटर जमीन सरकारने आयआयटी प्रकल्पाच्या नावावर केली आहे. त्याचप्रमाणे प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणाऱया आंदोलकांवर सरकारने फौजदारी खटले दाखल केले आहेत. सदर खटले मागे घेणे व आयआयटी प्रकल्पाच्या नावावर केलेली जमीन पुन्हा एकदा सरकारच्या नावावर करणे अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानंतर गेल्या आठवडय़ापासून या आंदोलनाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची आश्वासन सरकारने दिले होते. मात्र त्याची पूर्तता अजून पर्यंत झालेली नाही. जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी आज पुन्हा एकदा सरकारला दिला.

गेल्या आठवडाभर शुक्रवारपर्यंत शेळ मेळावली ग्रामस्था?नी पंचायतीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. शनिवारी व रविवारी सुट्टी होती. यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. आज सोमवारपासून पुन्हा एकदा या आंदोलनाला सुरुवात झाली. आज मात्र या आंदोलनाने वेगळय़ा प्रकारची कलाटणी घेतली.

सकाळी पंचायतीचा दरवाजा उघडल्यानंतर या आंदोलनाला सुरुवात झाली. दुपारी पंचायतीचे दरवाजे बंद करण्याचा प्रयत्न केला असता संबंधित सचिवांना आंदोलनकर्त्यांनी रोखून धरले .जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत कार्यालय बंद करून देणार नसल्याचा इशारा दिला .यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून सचिवानी कार्यालय सोडले. संध्याकाळी पुन्हा एकदा 5 वाजण्याच्या सुमारास पंचायतीचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला असता तो रोखून धरण्यात आला .जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत पंचायतीचे कार्यालय बंद करू देणार नसल्याचा इशारा देण्यात आला.

याची दखल घेऊन  तालुक्मयाचे उपजिल्हाधिकारी प्रवीण परब व इतर अधिकारी पोलिस बंदोबस्तासह घटनास्थळी हजर झाले. यावेळी प्रवीण परब यांनी आंदोलनकर्त्यांची सविस्तरपणे चर्चा केली. कायदा हातात घेऊ नका ,आंदोलन करायचे असेल तर इतर मार्गाने करा अशा प्रकारची सूचना यावेळी त्यांनी केली. मात्र आंदोलनकर्त्यांनी प्रश्नांचा भडिमार करून त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा दिला .शेवटी उपजिल्हाधिकारी प्रवीण परब हे घटनास्थळावरून परतले.

पंचायतीचे कार्यालय उघडेच.

दरम्यान रात्री उशिरापर्यंत पंचायतीचे कार्यालय उघडे होते. या कार्यालयांमध्ये आंदोलन करते ठाण मांडून बसले होते. यामुळे पंचायतीचा दरवाजा बंद करता आला नाही .रात्रभर आंदोलन करणार असून उद्या पुन्हा एकदा सकाळपासून याला सुरुवात होणार आहे .जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कदापि मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे. यामुळे मंगळवारी पुन्हा एकदा या आंदोलनाला वेगळय़ा प्रकारची कलाटणी मिळण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. कदाचित सरकार पोलीस बळाचा वापर करून आंदोलनकर्त्यावर कारवाई करण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.

गांजे प्रकल्पाच्या उदघाटनाला चोख बंदोबस्त.

दरम्यान म्हादई नदीवर गांजे या ठिकाणी 111 कोटी खर्च?न जलस्तोत्र खात्याने प्रकल्पाची उभारणी केलेली आहे. सदर प्रकल्पाचे उद्घाटन मंगळवारी सकाळी 11.30 वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आरोग्यमंत्री विश्वजित राणे, मंत्री फिलिप नेरी यांच्या हस्ते होणार आहे .गुळेली या ठिकाणी सुरू असलेले आंदोलन व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. यामुळे सदर कार्यक्रमाला मोठय़ा प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आंदोलनकर्त्यांनी सदर ठिकाणी जाऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.

Related Stories

कुडचडे बाजारात भटक्या गुरांची डोकेदुखी कायम

Amit Kulkarni

हसन खान खूनप्रकरणी पाच आरोपींना जन्मठेप

Amit Kulkarni

सिलिंडरचा स्फोट होऊन हणजूणमध्ये तरुण ठार

Amit Kulkarni

महिला परिषदेतर्फे वनमहोत्सव साजरा

Amit Kulkarni

आय-लीगमध्ये मोहम्मेडन स्पोर्टिंग पराभूत; एजॉल-सुदेवा बरोबरीत

Amit Kulkarni

गोव्यातील 900 पोलिसांचे उत्तर प्रदेशमधून गोव्याकडे प्रयाण, गुरूवारी दाखल होणार

Amit Kulkarni