प्रतिनिधी /बेळगाव
केएलई एम. एस. शेषगिरी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ऍन्ड टेक्नॉलॉजी येथे केएलई संस्थेचा 106 स्थापना दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी डीन डॉ. एस. एम. पाटील यांनी स्वागत करुन संस्था स्थापन केलेल्या सप्तर्षींना पुष्पांजली अर्पण केली. यावेळी ते म्हणाले, या सप्तर्षींनी स्थापन केलेल्या केएलई संस्थेने उत्तर कर्नाटकाचा विकास होण्यास महत्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या दहा दशकांत संस्थेने केलेली प्रगती ही उल्लेखनिय आहे.
डीन डॉ. एन. ए. कामोजी यांनी एखाद्या संस्थेची शतकपूर्ती हा मैलाचा दगड असतो. उत्तम व्यवस्थापन हे केएलई संस्थेचे वैशिष्ट आहे, असे सांगितले. प्राचार्य डॉ. बसवराज कटगेरी यांनी 1916 पासून आजपर्यंत संस्थेने उल्लेखनीय प्रगती केली असून 260 शैक्षणिक संस्था संस्थेने सुरू केल्या आहेत, अशी माहिती दिली. शारीरिक शिक्षण संचालक जयदेव यांनी आभार मानले.