Tarun Bharat

”शैक्षणिक गुणवत्ता संपवण्याचा ठाकरे सरकारचा डाव”

भाजपचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचा आरोप

प्रतिनिधी / कोल्हापूर

तुम्हाला शिक्षणाचा खेळखंडोबा करायचा आहे का, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतरही परीक्षा आणि प्रवेशाचे गाडे रुळावर आले नसताना त्यात मनमानी शुल्कवाढीची भर पडल्याने ठाकरे सरकारचा धोरण लकवा स्पष्ट झाला आहे, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. शैक्षणिक शुल्क निश्चितीसाठी समिती हा निव्वळ वेळकाढूपणा असून शिक्षणसंस्थांच्या मनमानी फी आकारणीस चाप लावण्यात शासन सपशेल अपयशी ठरल्याचीच ही कबुली आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. मूल्यमापनाच्या आधारे दहावी-बारावीचे निकाल देऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता संपविण्याचा शिक्षण खात्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

अगोदर शुल्कनिश्चितीचा प्रस्ताव खुंटीवर टांगून ठाकरे सरकारने हजारो पालक आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप दिला व शाळाचालकांना मनमानी शुल्कआकारणीस मुभा मिळाली. गेल्या वर्षात शिक्षणाची वाताहत झाल्यानंतर यंदा ऑनलाईन शिक्षण देणाया शाळांनी सक्तीने जबर फी आकारणी केल्याने हजारो कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कोरोनामुळे कुटुंबांचे उत्पन्न घटले असतानाच शाळांच्या मनमानीस मुभा देऊन ठाकरे सरकार सामान्य माणसांची लुबाडणूक करण्यास थेट हातभार लावत आहे. असा आरोप पत्रकात केला आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, प्रवेशाबाबत शिक्षण हक्क कायद्याने घालून दिलेली बंधनेही अनेक शिक्षण संस्थांनी झुगारली आहेत. शासनाकडून निधी मिळत नसल्याचे कारण देत प्रवेश नाकारले जात असल्याने शिक्षणापासून मुलांना वंचित ठेवण्यास राज्य शासनच जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला. शाळा बंद असल्यामुळे शाळांमधील ज्या सुविधा विद्यार्थी वापरत नाहीत. त्याचे शुल्क आकारू नये असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले असतानाही राज्यातील अनेक शिक्षणसंस्था संपूर्ण फी एकरकमी भरण्याची सक्ती पालकांवर करत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे तातडीने शुल्कनिश्चिती करून शाळांना चाप लावा, अशी मागणी राहूल चिकोडे यांनी केली आहे.

Related Stories

इंदापूरमध्ये कारवार एव्हीएशनचं विमान कोसळलं ; पायलट महिला जखमी

Abhijeet Khandekar

महाराष्ट्रात 10,792 नवे कोरोना रुग्ण; 309 मृत्यू

Tousif Mujawar

Kolhapur; जिल्हा परिषदेच्या ‘आरोग्य’ विभागात लाचखोरीचा ‘कळस’

Abhijeet Khandekar

कामगारांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ : आयुक्त डॉ. कलशेट्टी

Archana Banage

लॉकडाऊनमध्ये शिवभोजन थाळी बनली आधार

Patil_p

Karnataka : कर्नाटक टीईटी परीक्षेच्या प्रवेशपत्रावर सनी लिओनीचा फोटो?

Kalyani Amanagi