Tarun Bharat

शैक्षणिक दर्जात अव्वल असणारे केंब्रिज स्कूल बेळगावात

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

एसपीएम रोड येथील गजाननराव भातकांडे शाळेच्या पुढाकाराने केंब्रिज इंटरनॅशनल मोंटेसरी प्री-स्कूल येत्या शैक्षणिक वर्षापासून बेळगावात सुरू होणार आहे. कुंतीनगर, टिचर्स कॉलनी, खासबाग येथे हे स्कूल सुरू होणार आहे. बेळगाव आणि परिसरातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी भातकांडे शाळेने केंब्रिज स्कूलशी समन्वय करार केला आहे.

 केंब्रिज (लंडन) स्कूलच्या जगभरात 170 शाखा असून उत्तर कर्नाटकात बेळगावात सुरू होणारी ही पहिली शाळा ठरणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून या ठिकाणी नर्सरी आणि केजीचे वर्ग भरणार असून पुढील तीन वर्षात शाळेची इमारत पूर्ण होणार आहे, असे शाळेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांनी सांगितले.

केंब्रिज स्कूलमध्ये एलकेजीपासूनच आधुनिक पद्धतीचे शिक्षण दिले जाते. या स्कूलमध्ये मिळणारे शिक्षण जागतिक दर्जाचे असून विद्यार्थ्यांना एक चांगली शाळा उपलब्ध होणार आहे. भातकांडे शाळेतर्फे कुंतीनगर येथील प्रशस्त अशा दोन एकर  जागेत नवीन शाळा उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. या ठिकाणी भव्य इमारतीसह आधुनिक लॅब, मैदान, वाचनालय, स्मार्ट बोर्ड रूम्स, संगणक खोली यांसह डायनिंग हॉल व अन्य सुविधा राहणार आहेत. लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे, असे मिलिंद भातकांडे यांनी कळविले आहे.

Related Stories

जिल्हाअंतर्गत परवानगीसाठी नागरिकांची मनपाकडे धाव

Patil_p

विजयनगर येथील नागरिकांनी आमदारांसमोर मांडल्या व्यथा

Amit Kulkarni

लोककल्प फौंडेशनतर्फे चोर्ला येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Amit Kulkarni

कणबर्गीतील अर्धवट गटारी बनल्या धोकादायक

Patil_p

बेळगावात गोवा बनावटीची दारू जप्त

Amit Kulkarni

वृद्धेच्या खूनप्रकरणी गिड्डारफीकला अटक

Amit Kulkarni
error: Content is protected !!