Tarun Bharat

शैलेश बलकवडे कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक

Advertisements

कोल्हापूर/ प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी गडचिरोलीचे शैलेश बलकवडे यांची बदली करण्यात आली. तर डॉ. अभिनव देशमुख यांची पुणे ग्रामिण अधीक्षकपदी बदलीचे आदेश झाली आहे. गुरुवारी रात्री हे बदलीचे आदेश गृहविभागाने काढले.

गेले महिनाभर जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या बदलीकडे सर्वाचे लक्ष लागून राहीले होते. कोल्हापूर अधीक्षकपदी अनेकांची नावे चर्चेत होती, अखेर गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची या पदावर वर्णी लागली. विशेष म्हणजे, ऑगस्ट २०१८ मध्ये गडचिरोलीमध्ये डॉ. देशमुख यांच्याकडूनच बलकवडे यांनी पदभार घेतला होता, तर आता दोन वर्षानंतर पुन्हा बलकवडे हे डॉ. देशमुख यांच्याकडूनच  कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षकपदाची सुत्रे घेणार आहेत.

डॉ. अभिनव देशमुख यांनी कोल्हापूर जिल्हा अधिक्षकपदाची सुत्रऑगष्ट २०१८ मध्ये घेतली होती, त्यांची कोल्हापूरातील पोलीस खात्यातील कारकिर्द अतिशय चांगली झाली. त्यांनी जिल्ह्यातील बेकायदेशीर व्यावसायिकांवर वचक ठेवला.

जिल्ह्यातील तब्बल गुंडांच्या १६ टोळ्यातील १४५ जणांवर मोकांतर्गत कारवाई करुन त्यांना गजाआड घातले. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकामध्ये शेतकरी आंदोलन त्यांनी उत्कृष्टपणे हाताळून कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांचे योगदान राहीले. २०१९ च्या महापूरातही पोलीस खात्याचे काम वाखाणण्याजोगे झाले.

Related Stories

संततधार पावसात शेतकऱ्यांचा आक्रोश

Archana Banage

‘शिष्यवृत्तीच्या रक्कमेत वाढ करणार’

Archana Banage

कोजिमाशि कर्ज मर्यादा 35 लाख करणार

Archana Banage

कोल्हापूर : कोरोनाच्या काळात रुग्णांना मिळतोय ‘आधार’

Archana Banage

कोल्हापूर : व्यापारी संघटनेचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवणार : जिल्हाधिकारी

Archana Banage

जिल्ह्यात दुपारी बारा वाजेपर्यंत ७५ पॉझिटिव्ह

Archana Banage
error: Content is protected !!