Tarun Bharat

शॉर्टसर्किटने फुलबाग गल्ली येथील घराला आग

आगीत संसार उद्ध्वस्त : 10 लाखांचे नुकसान : मदतीचे आवाहन

प्रतिनिधी / बेळगाव

फुलबाग गल्ली, दुसरा क्रॉस येथील घराला शॉर्टसर्किटने आग लागून घरासह घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. या घटनेत जवळपास 10 लाखांचे नुकसान झाले असून एका कुटुंबाचा संसार उघडय़ावर पडला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्मयात आणण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत घर जळून खाक झाले.

किरण शंकर पाटील यांच्या घराला सकाळी 10.30 च्या सुमारास शॉर्टसर्किटने अचानक आग लागली. गल्लीतील काही तरुणांनी ती आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग आटोक्मयात आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र तोपर्यंत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते.

तरुणांनी तातडीने सिलिंडर घरातून बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या आगीत धान्य, कपडे, अंथरुण यासह इतर जीवनावश्यक वस्तु जळून खाक झाल्या आहेत. तब्बल 10 लाखांचे नुकसान झाले आहे. सहा जणांचे हे कुटुंब आता उघडय़ावरच आले असून तातडीने या कुटुंबाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे. आता राहण्यासाठी जागा नाही आणि जगण्यासाठी अन्न नाही, अशी त्यांची अवस्था झाली असून जनतेनेही या कुटुंबाला मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर घर पत्र्याचे होते. लाकडी साहित्यावर हे पत्रे घालण्यात आले होते. शार्टसर्किटमुळे लाकडांनी पेट घेतला. यावेळी घरातील पुरुष मंडळी बाहेर गेली होती तर महिला कामामध्ये मग्न होत्या. त्यामुळे आग लागल्याचे कुणाच्याच लक्षात आले नाही. अचानक धूर येत असल्याचे दिसून आल्यानंतर आरडाओरड करण्यात आली. गल्लीतील नागरिकांनी प्रथम पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररुप धारण केल्याने मोठे नुकसान झाले आहे.

रक्कमही जळून खाक

या आगीमध्ये कामानिमित्त आणून ठेवलेले 58 हजार रुपयांची रक्कम जळून खाक झाली. कपाटामध्ये ठेवलेली रक्कम घाईगडबडीत आणि झालेल्या गोंधळामध्ये तशीच राहिली. बऱयाच उशिरानंतर कुटुंबीयांच्या लक्षात आले. मात्र तोपर्यंत ती रक्कम जळून खाक झाली होती. यामुळे हळहळ व्यक्त करण्यात आली.

एअरफोर्स मैदानाला आग नागरिकांना फटका नरगुंदकर कॉलनी-गुरुप्रसाद कॉलनीजवळ घटना

बेळगाव : मंडोळी रोडवरील नरगुंदकर कॉलनी आणि गुरुप्रसाद कॉलनीजवळ असलेल्या एअरफोर्स मैदानातील गवत व बांबुंना आग लावण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला. या आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे कॉलनीतील घरांना मोठा धोका पोहोचला होता. तातडीने याबाबत अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्मयात आणली.

नरगुंदकर कॉलनी आणि गुरुप्रसाद कॉलनीला लागूनच या मैदानाचे कंपाऊंड आहे. या मैदानामध्ये मोठय़ा प्रमाणात बांबू आहेत. याचबरोबर गवतही असते. गवळी तसेच शेतकरी हे गवत खरेदी करतात. मात्र उन्हाळय़ामध्ये त्याला आग लावली जाते. मंगळवारीही त्याला आग लावण्यात आली. ऊन आणि उष्म्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले.

आगीचे लोळ बाजूच्या दोन्ही कॉलनींकडे जात असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. साऱयांच्याच मनामध्ये भीती निर्माण झाली. दरवषी अशा प्रकारे समस्या होत आहे. या मैदानामुळे येथे सापांचा वावरही अधिक असल्यामुळे या दोन्ही कॉलनीतील लोकांना त्यांचा धोका निर्माण झाला आहे. तेव्हा एअरफोर्स व वन खात्याने याची दखल घ्यावी, अशी मागणी येथील जनतेतून होत आहे.

Related Stories

आज खंडग्रास सूर्यग्रहण

Patil_p

सिव्हिल हॉस्पिटलमधील जलशुध्दीकरण केंद्र बंद

Patil_p

शिक्षकांसाठी आजपासून विषयनिहाय कार्यशाळा

Patil_p

आंतरविद्यापीठ स्केटिंग स्पर्धेत अभिषेक नवलेला सुवर्ण

Amit Kulkarni

31 मे पर्यंत जिल्हय़ात जमावबंदी

Patil_p

मालिकांमधील स्त्रीची प्रतिमा आभासी

Omkar B
error: Content is protected !!