Tarun Bharat

शॉर्टसर्किटमुळे कॅम्प येथे लागली आग

स्टेट बँकेच्या पत्र्यांवरील कचऱयाने घेतला पेट

प्रतिनिधी /बेळगाव

शॉर्टसर्किटमुळे झाडांच्या पालापाचोळय़ाने पेट घेतल्याची घटना शुक्रवारी सकाळी कॅम्प येथे घडली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेमध्ये ही घटना घडल्यानंतर काहीकाळ गोंधळ उडाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही क्षणातच घटनास्थळी पोहोचत आग आटोक्मयात आणली. वेळीच आग विझविण्यात आल्याने मोठे नुकसान टळले.

स्टेट बँक परिसरात असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधून अधूनमधून आगीच्या ठिणग्या बाहेर पडत असतात. शुक्रवारी सकाळी अशाच ठिणग्या थेट स्टेट बँक इमारतीच्या पत्र्यांवर पडल्या. पत्र्यांवर झाडांचा पालापाचोळा साचला होता. या सुकलेल्या पालापाचोळय़ाने क्षणार्धात पेट घेतला. आग लागलेली समजताच बँक कर्मचाऱयांसह आसपासच्या नागरिकांचा गोंधळ उडाला. अग्निशमन दलाला फोन करून घटनेची माहिती कळविण्यात आली.

काही क्षणातच अग्निशमनचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वेळीच आग विझविली. आग पसरली असती तर बँकेचे मोठे नुकसान झाले असते.

Related Stories

जिल्हय़ातून बदली झालेल्या न्यायाधीशांचा सत्कार

Amit Kulkarni

गुऱ्हाळ घर प्रकल्पास नियमांची आडकाठी

Omkar B

सौरऊर्जेचा मामला अन् बिम्सने ढापला!

Amit Kulkarni

कॅम्प येथील रहिवाशाचा खून

mithun mane

बागलकोट जिल्हय़ात 19 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले

Patil_p

प्रपंचाची कावड…अन् शिक्षणाची परवड

Amit Kulkarni