Tarun Bharat

शोपियाँ चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 
 
जम्मू-काश्मीरच्या शोपियाँमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळी चकमक झाली. या चकमकील तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले. त्यांच्याकडील दोन एके 47 रायफल्स आणि पिस्तुल ताब्यात घेण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे.

शोपियाँमधील एका परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार जवानांनी शोधमोहिम हाती घेतली. शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्याला दहशतवाद्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. या परिसरात चकमक अद्याप सुरू असून, दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

Related Stories

चर्चेदरम्यान चीनने वाढविले सैनिक

Patil_p

देशात राहणार केवळ पाच सरकारी बँका

datta jadhav

किरणोत्सारी साधनामुळे चिमोली प्रलय ?

Patil_p

अदानी लॉजिस्टिक्सची नवकारकडून 835 कोटी रुपयांना कंटेनर डेपोची खरेदी

Patil_p

बीआरएसचा मोठा नेता भाजपच्या वाटेवर

Patil_p

मूसाने न्यायाधीशावर फेकले चप्पल

Patil_p