Tarun Bharat

शोपियांमध्ये सुरक्षा दल- दहशतवाद्यांमध्ये चकमक

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

काश्मीरच्या शोपियांमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफचे संयुक्त पथक ही कारवाई करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत एक ते दोन दहशतवाद्यांना घेरल्याची शक्यता आहे. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

शोपियां जिल्ह्यातील कनिगम परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने परिसराला घेराव घालून, शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला सुरक्षा दल चोख प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये सुरक्षा दलांनी मोठे यश मिळवले आहे. सईदाबाद भागातून दहशतवाद्यांच्या एका मदतनीसाला अटक करण्यात आली आहे. मागील तीन दिवसांत सुरक्षा दलांनी  दहशतवाद्यांच्या 11 मदतनिसांना अटक केली आहे. 

Related Stories

शिवरायांनाही रोखण्याचे प्रयत्न झाले होते

Abhijeet Khandekar

भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत 77.8 टक्के प्रभावी!

Tousif Mujawar

‘कर्तव्यपथा’वर ‘आत्मनिर्भर’तेचे दर्शन

Patil_p

लालूंच्या पक्षाला मोठा धक्का

Patil_p

दिल्लीतील मशिदीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, मौलाना अटकेत

Archana Banage

शेतकऱयांचा शेतात मृत्यू झाल्यास 5 लाखांची मदत

prashant_c