Tarun Bharat

शोपियां चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा; शोधमोहीम सुरू

Advertisements

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

दक्षिण काश्मीरच्या शोपियांमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज पहाटे चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटली नसून, या भागात शोधमोहीम सुरू आहे.

शोपियांमधील राखमा भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार शोधमोहीम हाती घेण्यात आली. सुरक्षा दलांनी राखमा परिसराला वेढा घातला. दरम्यान, सुरक्षा दलांचा वेढा घट्ट होताच लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले.

Related Stories

मुंबईत संशयित दहशतवादी ताब्यात

Patil_p

दुसऱया लाटेत 1 कोटींहून अधिक जण बेरोजगार

Amit Kulkarni

इराणच्या सैनिकांचा तालिबानशी संघर्ष

Patil_p

भारत बायोटेक : लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी 8 हजार स्वयंसेवकांची नियुक्ती

datta jadhav

ख्रिसमस, नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवर दिल्लीत बंदी

Patil_p

सौराष्ट्र-कच्छ येथे 6 तासांमध्ये 10 वेळा जाणवले भूकंपाचे धक्के

Patil_p
error: Content is protected !!