Tarun Bharat

शोपियां चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

दक्षिण काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळी चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले. हे दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचे सदस्य असल्याचे सांगण्यात येते.

शोपियां जिल्ह्यातील अमशीपोरा गावात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यानुसार लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त दलाने या परिसरात शोध मोहिम सुरु केली. गावाला घेराव घालून शोधमोहिम सुरू असतानाच लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. या गोळीबाराला सुरक्षा दलानेही चोख प्रत्युत्तर दिले. यात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले. जवळपास दोन तास चकमक सुरु होती. चकमकीत ठार झालेले दोघेही स्थानिक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्याकडील दारुगोळा आणि आक्षेपार्ह साहित्यही जप्त करण्यात आले.

Related Stories

देशात आजही गुलामीच्या काळातील कायदा व्यवस्था

Patil_p

ठाकरे सरकारने होळी, धुळवडीवरील निर्बंध हटवले

Abhijeet Khandekar

बंगालमध्ये पहिल्यांदाच काँग्रेस-डाव्यांना भोपळा

Patil_p

नौशेरा सेक्टरमध्ये पाक सैन्यांकडून गोळीबार; भारतीय जवान शहीद

datta jadhav

Video :अंध माऊलीच्या हातातला चिमुकला चालताना अचानक रेल्वे ट्रॅकवर पडला आणि तेवढ्यात रेल्वे आली, मग जे झाले….

Archana Banage

आठ लाखांची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षकासह कॉन्स्टेबल अटकेत

datta jadhav