Tarun Bharat

शौचालयाची टाकी साफ करताना चार तरुण टाकीत पडले, तिघांचा मृत्यू

Advertisements

ऑनलाईन टीम / पुणे :

पुण्यात शौचालयाची टाकी साफ करताना चार तरुण टाकीत पडले. यामधील तीन तरुणांचा मृत्यू झाला असून, एकाला वाचविण्यात यश आले आहे. पुण्यातील लोणी काळभोर परिसरातील हॉटेल प्यासा जवळ ही घटना घडली.

प्यासा हॉटेलच्या मागीलबाजूस जय मल्हार कृपा बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगच्या शौचालयाची टाकी उपसण्यासाठी चार तरुण आले होते. टाकीत पाईप टाकताना एक तरुण तोल जावून टाकीत पडला. या तरुणाला वाचवण्याच्या प्रयत्नात असलेले तीन तरुणही त्याच टाकीत पडले. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने चौघांना बाहेर काढण्यात आले. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. तर बेशुद्धावस्थेत असलेल्या एकाला वाचविण्यात यश आले. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

अग्निपथ योजनेतील भरती प्रक्रिया दोन दिवसात सुरु होणार ; लष्कर प्रमुखांची घोषणा

Abhijeet Shinde

पूराच्या संभाव्य भीतीच्या पार्श्वभुमीवर तातडीने सर्वसमावेशक बैठक बोलवा

Kalyani Amanagi

उडगी-कलप्पावाडी रस्त्यावर एसटी पलटी : जीवितहानी नाही

Abhijeet Khandekar

मालमत्तेच्या वादातून सावत्र आईचा खून, मुलास जन्मठेप

Abhijeet Khandekar

LPG गॅस सिलिंडरच्या दरात कपात

datta jadhav

दाऊदचे सर्व हस्तक एकत्र?, मोहित कंबोजच्या ट्विटने खळबळ

datta jadhav
error: Content is protected !!