Tarun Bharat

शौचालयासाठी आमरण उपोषणाचा इशारा

आटपाडीतील किस्सा : सख्ख्या भावंडात शौचालयाचा संघर्ष

आटपाडी / प्रतिनिधी

आजपर्यंत विविध मागण्यांसाठी आंदोलने, उपोषणाचा इशारा दिल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. परंतु चक्क स्वतःच्या जागेत शौचालय उभारण्यासाठी सख्ख्या भावाकडून होत असलेल्या अडथळ्यामुळे हैराण बनलेल्या आटपाडीतील एकाने शौचालयासाठी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. एका शौचालयामुळे सख्ख्या भावातील संघर्ष उपोषणाच्या वळणावर पोहचला असुन त्याची खुमासदार चर्चा रंगली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना आटपाडीतील फारूक गुलाब तांबोळी यांनी निवेदन देत शौचालयाची कहाणी मांडुन ते उभारणीसाठी उपोषणाचा इशारा दिला आहे. आटपाडीतील गट नं.२६८८मध्ये असलेल्या स्वमालकीच्या जागेत सख्खा भाऊ इकबाल तांबोळी व त्यांच्या मुलांनी शौचालय उभारणीस अडथळा करत शौचालयाचे काम सुरू असताना मारहाण केल्याचा आरोप फारुक तांबोळी यांनी केला आहे. देशात घर तेथे शौचालयाचा नारा देवुन अनुदान दिले जात आहे. जनजागृती मोठ्या प्रमाणात होत आहे.

असे असतानाही आटपाडीत स्वमालकीच्या जागेत शौचालय उभारण्यास बंधु इकबाल तांबोळी व त्यांच्या मुलांनी शौचालय उभारण्यास अडथळा करत शौचालयाचे काम सुरू असताना मारहाण केल्याचा आरोप फारुक तांबोळी यांनी केला आहे. देशात घर तेथे शौचालयाचा नारा देवुन अनुदान दिले जात आहे. जनजागृती मोठ्या प्रमाणात होत आहे.

असे असतानाही आटपाडीत स्वमालकीच्या जागेत शौचालय उभारण्यास बंधु इकबाल, मयत बंधु हिरालाल यांचे कुटुंबिय मारहाण करत आहेत. याबाबत आटपाडी पोलीसात तक्रार करुनही दिलासा मिळाला नसल्याचे फारुक याने नमुद केले आहे. जागेच्या प्रश्नावरून मोठा संघर्षही झाला असून तहसीलदार, प्रांतांसह न्यायालयातही माझ्या बाजुने निकाल लागुनही अडथळे आणुन त्रास दिला जात असल्याचे फारुक तांबोळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

शौचालय उभारण्यासाठी होत असलेली अडवणुक व मारहाणीमुळे हैराण बनलेल्या फाल्क याने शौचालय बांधण्यासाठी गुरुवार दिनांक २२ जुनपासुन आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. दरम्यान शौचालयासाठी उपोषणास बसण्याच्या मुमिकेची आटपाडी तालुक्यात खुमासदार चर्चा सुरु असुन सख्ख्या भावाकडुन शौचालयासाठी होत असलेल्या आकाठीचा विषय चर्चेत आला आहे

Related Stories

हाजी अली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी

datta jadhav

सोलापूर ग्रामीणमध्ये आज १५ कोरोनाबाधितांची भर

Archana Banage

‘मविआ’च्या महामोर्चाला अटीशर्थींसह परवानगी

datta jadhav

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Tousif Mujawar

शासनाच्या आदर्श ‘रेशन वितरण’ व्यवस्थेचा खेळखंडोबा

Archana Banage

सांगली : हुमा घुबड तस्करी प्रकरणी स्टिंग ऑपेरेशन करून पाच आरोपींना रंगे हात पकडले

Archana Banage