Tarun Bharat

श्रद्धाच्या हत्येची अफताबकडून कबुली

पॉलिग्राफ चाचणीचे यश, आज नार्को चाचणी, ब्रेन मॅपिंगचाही विचार

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

तीन दिवस चाललेल्या पॉलिग्राफ चाचणीत श्रद्धा वालकर हिच्या खुनाचा आरोप असलेल्या अफताब पूनावाला याने आपल्या गुन्हय़ाची कबुली दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या चाचणीचा अधिकृत अहवाल अद्याप पोलिसांना सादर करण्यात आलेला नाही. मात्र, तो येत्या चोवीस तासांमध्ये हाती येईल.

आज गुरुवारी त्याची नार्को चाचणी करण्यात येणार आहे. बऱयाच वेळा ही चाचणी लांबणीवर टाकण्यात आली होती. मात्र, आता ती केली जाणार असून दिल्लीतील न्यायालयाने पोलिसांनी तशी अनुमती दिली आहे. मात्र, पॉलिग्राफ चाचणीत अफताब पूनावाला याने गुन्हय़ाची कबुली दिल्याने पोलिसांचे काम तुलनेते सोपे झाले आहे. हत्येसाठी त्याने कोणताही खेदही व्यक्त केलेला नाही. यावरुन त्याने अत्यंत थंड डोक्याने आणि योजना आखून ही हत्या केली हे स्पष्ट होते. नार्को चाचणीतून अधिक माहिती समोर येईल, असे तज्ञांचे मत आहे.

तर बेन मॅपिंग करणार

काही कारणांमुळे नार्को चाचणी अपयशी ठरल्यास अगर अपूर्ण राहिल्यास पूनावाला याची बेन मॅपिंग चाचणी करण्यात येईल. या चाचणीत आरोपीच्या मेंदूतून निघणारे विद्युत तरंग टिपले जातात. त्यावरुन तो सत्य सांगत आहे की नाही, हे पुष्कळसे अचूकपणे समजून येते. गुन्हेगाराकडून त्याची रहस्ये जाणून घेण्यासाठी या चाचणीचा उपयोग करण्यात येतो. श्रद्धाची हत्या करुन तिचा मृतदेह जंगलात फेकल्याची कबुली त्याने दिली आहे. तसेच डेटिंग ऍपवर अनेक तरुणींशी त्याने मैत्री केल्याचीही कबुली दिली आहे. हत्या करण्याच्या आधीही त्याचे अनेक तरुणींशी संबंध होते याचीही त्याने कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नव्या मैत्रिणीची चौकशी

पूनावाला याची एक नवी मैत्रिण समोर आली आहे. श्रद्धा वालकरची हत्या झाल्यानंतर आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे त्याने फ्रीझमध्ये भरुन ठेवल्यानंतर ही मैत्रिण त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी आली होती, असे तिचे म्हणणे आहे. मात्र, त्याने अशी काही हत्या केली आहे आणि मृतदेहाचे तुकडे घरातच फ्रीझमध्ये आहेत, याचा मागमूसही आपल्याला लागला नाही, असे तिचे म्हणणे आहे. श्रद्धाच्या हत्येनंतर या तरुणीशी त्याने डेटिंग सुरु केल्याचेही उघड झाले आहे. ही तरुणी व्यवसायाने मानसोपचार तज्ञ आहे, असेही उघड झाले आहे.

आफताब कमालीचा व्यसनी

या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याला सिगरेट ओढणे, ड्रग्ज सेवन करणे, दारु पिणे आदी अनेक व्यसने आहेत, असे आतातर्यंतच्या तपासात उघड झाले आहे. त्याच्याजवळ अत्तरे आणि डिओडंटस्चा मोठा साठा होता. तो अनेकांना नेहमी अत्तरे भेट देत असे, असेही स्पष्ट झाले आहे.

Related Stories

दुसरा मजला नसलेले अनोखे गाव

Patil_p

सिद्धू यांचे मुख्यमंत्री अमरिंदर यांना आव्हान

Patil_p

कोरोना विरोधातील देशाचा ‘नायक’

Patil_p

नलहाटीत तृणमूलला पराभूत करण्यासाठी धडपड

Patil_p

केसीआर यांची कन्या दाखल करणार मानहानीचा खटला

Patil_p

युक्रेन संकट : अमेरिकेसोबत रशियाची लवकरच चर्चा

Patil_p