Tarun Bharat

पुणे : श्रावणी सोमवार निमित्त दत्तमंदिरात बेलाच्या पानांच्या प्रतिकृतीची आरास

ऑनलाईन टीम / पुणे :

श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारनिमित्त बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात बेलाच्या पानांच्या भव्य प्रतिकृतीची आरास करण्यात आली. बेलाची पाने आणि विविधरंगी फुलांनी मंदिराचा गाभारा व सभामंडप सजविण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे मंदिर बंद असल्याने भक्तांनी बाहेरुनच दर्शन घेतले, तसेच मंदिरात केवळ धार्मिक विधी पार पडले.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, विश्वस्त अंकुश काकडे यांसह कर्मचारी सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून उपस्थित होते. ट्रस्टचे यंदा 123 वे वर्ष आहे. मंदिरात रुद्रयाग व हवन यशोधन शिवराज कदम जहागिरदार यांच्या हस्ते पार पडला. पूजेला 1008 बिल्वपत्र अर्पण करण्यात आली.

ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी बेलाच्या पानांची ही आकर्षक आरास करण्यात आली. सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी देखील पार पडले. ट्रस्टच्या विश्वस्तांच्या आणि कर्मचा-यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, याकरीता प्रार्थना करण्यात आली.

Related Stories

सुगंधी निसर्गोत्सव चैत्रमास

Omkar B

ताण-तणावाच्या निराकरणासाठी खेळ आवश्यक : डॉ. दीपक म्हैसेकर

prashant_c

म्हापशात पोलीस खात्यातर्फे कोरोना जनजागृती गीत सादर

Omkar B

सुंदरबनच्या 4 हजार ‘टायगर विडो’

Patil_p

उत्तम नागरिक घडविण्यासाठी शूरवीरांचा आदर्श समोर ठेवा

prashant_c

१०१ व्या वर्षीही त्यांना ना शुगर, ना बी.पी

Archana Banage
error: Content is protected !!