Tarun Bharat

श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिरतर्फे 19 पासून भव्य भजन स्पर्धा

प्रतिनिधी / बेळगाव

श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर आणि इन्फिनिटी फिल्म प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 19 पासून सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत भव्य खुल्या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येथील विसर्जन तलावानजीक ही स्पर्धा 19, 20, 21, 22 असे चार दिवस चालणार आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

भावी पिढीमध्ये भजन संस्कृती रुजावी या उद्देशाने भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या भजनी मंडळांना अनुक्रमे रु. 25, 20, 15, 10, 5 हजार यासह इतर आकर्षक बक्षिसे देऊन गैरविले जाणार आहे. याचबरोबर गायक, टाळ वादक, तबला वादक आणि उत्कृष्ट भजनी मंडळांचा बक्षिसे देऊन सन्मान केला जाणार आहे.

मंडळांनी लाभ घेण्याचे आवाहन

‘स्वर सप्तसुरांचे… नाद भजनाचे’ नावाने ही स्पर्धा चार दिवस चालणार आहे. पाचव्या दिवशी 23 रोजी ‘दीपोत्सव ः गजर टाळ-मृदंगाचा’ हा मुख्य कार्यक्रम होणार आहे. यावेळी विजेत्या भजनी मंडळांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे. बेळगाव शहरात प्रथमच कपिलेश्वर मंदिरतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून बेळगाव, खानापूर, चंदगड यासह परिसरातील भजनी मंडळांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते भजन गायन स्पर्धेच्या निमंत्रण पत्रिकेचे प्रकाशन झाले.

याप्रसंगी ट्रस्टी अभिजित चव्हाण, सतीश निलजकर, राकेश कलघटगी, विवेक पाटील, अनुप पवार, राहुल कुरणे, अभय लगाडे आदी उपस्थित होते.

Related Stories

अज्ञात वाहनाच्या ठोकरीने तरुणाचा मृत्यू

Patil_p

ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानच्या एसएसएलसी व्याख्यानमालेला प्रारंभ

Amit Kulkarni

उचगाव मळेकरणी यात्रेला अलोट गर्दी

Amit Kulkarni

नंदिहळ्ळीत ‘लम्पी’ने बैल दगावला

Amit Kulkarni

केदनूरच्या सौंदर्या अजाणी ठरल्या इलेक्ट्रिक स्कूटीच्या मानकरी

Amit Kulkarni

नवग्रह ब्रह्मलिंग मंदिराची वास्तूशांती-गृहप्रवेश कार्यक्रम

Omkar B
error: Content is protected !!