Tarun Bharat

श्रीनगरमध्ये ‘तोयबा’च्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Advertisements

श्रीनगर / वृत्तसंस्था

काश्मीर खोऱयात गेल्या काही दिवसात दहशतवादी कारवाया बऱयाच वाढल्या आहेत. शुक्रवारीही श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा जवानांना यश आले आहे. गेल्या पंधरवडय़ातील ही सातवी चकमक आहे. या संघर्षात सुरक्षा दलांनी राबविलेल्या मोहिमेत 14 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यापूर्वी बुधवारी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा भागात झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते.

श्रीनगरमधील दानमार भागात झालेल्या चकमकीत दोन अज्ञात दहशतवादी ठार झाले आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यातील संघर्षात लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी मारले गेल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली आहे. शुक्रवारी पहाटे दानमार परिसरातील आलमदार कॉलनी येथे चकमकीला सुरुवात झाली. यात 2 दहशतवाद्यांना मारण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती काश्मीर झोनमधील पोलिसांनी ट्विटरवरून दिली आहे. या चकमकीनंतर परिसरात अन्य दहशतवाद्यांचा शोध चालू असल्याचेही ट्विट करण्यात आले आहे.

श्रीनगरच्या ईदगाह परिसरातील दानमार सय्यदपोरा येथे दोन दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे सैन्याच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरु केली. सैन्याच्या संयुक्त पथकाने संशयित जागेला घेराव घातला. तेथे दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर पलटवार करण्यासाठी पोलिसांनी गोळय़ा झाडायला सुरूवात केली. यामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस यशस्वी ठरले.

Related Stories

गजाननाच्या 3106 मूर्तींचा संग्रह

Patil_p

बारामुल्लातील चकमकीत दहशतवाद्याला कंठस्नान

Amit Kulkarni

इस्लामी दहशतवाद्यांना संघ कार्यकर्त्यांची माहिती पुरविणारा पोलीस निलंबित

Patil_p

ट्रेलर-बस धडकेत 12 जणांचा होरपळून मृत्यू

Patil_p

कोरोनाचा विस्फोट : भोपाळ एम्स रुग्णालयातील 24 डॉक्टर पॉझिटिव्ह

Rohan_P

गुजरातमधील गिर सोमनाथ समुद्रात वादळामुळे १५ बोटी बुडाल्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!