Tarun Bharat

श्रीनगरमध्ये CRPF आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; इंटरनेट सेवा बंद

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

श्रीनगरमधील नवाकदल परिसरात सोमवारी रात्री सुरक्षा दल, काश्मीर पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एक पोलीस जवान जखमी झाला आहे. सकाळी पुन्हा सर्च ऑपरेशनवेळी दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. या चकमकीला भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. या चकमकीमुळे संपूर्ण राज्यातील इंटरनेटसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. 

सीआरपीएफ आणि काश्मीर पोलिसांनी श्रीनगरमधील नवाकदल परिसरातील दाट लोकवस्तीत सोमवारी मध्यरात्री शोधमोहीम सुरू केली होती. यावेळी झालेल्या चकमकीनंतर संपूर्ण राज्यातील इंटरनेटसेवा बंद करण्यात आली आहे. 

दरम्यान, 17 मे रोजी जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील एका गावात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये भारतीय सैन्य दलाचा एक जवान शहीद झाला होता.

Related Stories

सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Archana Banage

आसाममध्ये बंद होणार शासन संचालित मदरसे

Patil_p

अमेरिकेत शिख विद्यार्थ्याला कृपाण बाळगता येणार

Patil_p

दहशतवादी हल्ल्यासाठी पेट्रोलपंप अन् टँकरचा वापर?

Patil_p

पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे

Patil_p

सिद्धूंना थेट भिडणार नाहीत अमरिंदर

Patil_p