Tarun Bharat

श्रीपेवाडीत 550 जणांना कोरोना प्रतिबंधक लस

अकोळ प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपक्रम

वार्ताहर / निपाणी

श्रीपेवाडी येथील सरकारी प्राथमिक शाळेत अकोळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम राबविण्यात आली. बुधवारी झालेल्या या मोहिमेत डॉ. शीतल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीपेवाडीसह परिसरातील सुमारे 550 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

श्रीपेवाडी येथे गेल्या दोन महिन्यात ही चौथी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ ज्योतिष विशारद दयानंद स्वामी यांना लस देऊन करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. शीतल कुलकर्णी म्हणाल्या, केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगातून प्रत्येकाला कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात लस मागणी अधिक होती आणि पुरवठा कमी होता. पण आता मागणी कमी आणि पुरवठा अधिक आहे. यामुळे लसीकरण मोहिमेत कोणतीही अडचण नाही. लवकरच अकोळ प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्र कोरोना प्रतिबंधक लसीकरण शंभर टक्के पूर्ण करेल असे सांगितले.

कारोना लसीकरण मोहीम राबविण्यासाठी आरोग्य कार्यकर्ते उदय केरगुट्टे रेखा केरगुट्टे, आशा कार्यकर्त्या वैशाली परीट, उषा मेस्त्री, पूजा पाटील, राजश्री पाटील, रूपाली सटाले, रेखा कांबळे, जयश्री कोरे, सूरज कोरे, अंगणवाडी कार्यकर्त्या सोनाबाई शिंपुकडे, अक्काताई कुंभार, शुभांगी केसरकर, ग्रा. पं. सदस्य पांडुरंग शिंपुकडे, विजय पोवार, सचिन कुंभार, मोहिनी वडगावे, नर्मदा पोवार, बनाबाई हंडोरी यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Related Stories

सुळगे (ये.) ग्रा. पं. अध्यक्षपदी गंगव्वा नाईक

Amit Kulkarni

कोल्हापूर ट्रायथ्लॉन स्पर्धेत सृष्टी पाटीलला सुवर्ण

Amit Kulkarni

कुर्ली येथील जवानाचा उत्तर प्रदेशमध्ये मृत्यू

Amit Kulkarni

जुलैपासून घरपट्टीवर 2 टक्के दंड आकारणी

Amit Kulkarni

शहराच्या पाणीपुरवठय़ात दोन दिवस व्यत्यय

Amit Kulkarni

कपिलेश्वर तलावात सांडपाणी

Amit Kulkarni