Tarun Bharat

श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानीच अव्वल स्थानी

Advertisements

फोर्ब्सच्या यादीत माहिती  : सायरस पूनावाला व दिलीप संघवी पहिल्या दहामध्ये

वृत्तसंस्था / मुंबई

देशामधील धनाढय़ांच्या यादीमध्ये पुन्हा एकदा मुकेश अंबानी अव्वल स्थानी विराजमान झाले आहेत. अंबानी यांच्याकडे जवळपास 6.27 लाख कोटी रुपयाची संपत्ती आहे. फोर्ब्सकडून भारतामधील सर्वाधिक धनाढय़ लोकांची यादी नुकतीच सादर करण्यात आली आहे. अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी हे या यादीत दुसऱया स्थानी राहिले असून यांची संपत्ती 3.75 लाख कोटी रुपयावर राहिली आहे.

दिग्गजांच्या यादीत तिसऱया स्थानावर शिव नाडर (आयटी क्षेत्रातील कंपनी एचसीएल टेकचे संस्थापक) हे असून त्यांची एकूण संपत्ती 1.74 लाख कोटीवर राहिली आहे. रिटेल किंगमध्ये मजबूत नाव असणारे दिग्गज व्यावसायिक राधाकृष्ण दमानी हे सदर यादीत चौथ्या स्थानावर राहिले आहेत.

दुसरीकडे या यादीत नव्या दोघा धनाढय़ांनी याखेपेस एंट्री मिळवली आहे. पहिल्या दहामध्ये आता सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे सायरस पुनावाला आणि सन फार्मास्युटिकल्सचे दिलीप संघवी यांचा समावेश झाला आहे. एसआयआय ही कोरोना लसीचे उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. सदर यादीमध्ये 10 व्या स्थानी सुनील मित्तल ऍण्ड फॅमिली असून यांची एकूण संपत्ती जवळपास 78.12 हजार कोटी रुपयांची आहे. मुकेश अंबानी आशिया खंडातही प्रथम स्थानी आहेत.

कोरोनातही अब्जाधीशांची संख्या वाढतीच

विशेष बाब म्हणजे कोरोना महामारीच्या काळातही देशातील श्रीमंतांची संख्या वाढत आहे. उपलब्ध अहवालानुसार यामध्ये चालू वर्षात एकूण अब्जाधीशांची संख्या आता 140 वर पोहचली आहे. जी मागील वर्षात 102 होती. जर यामध्ये सर्व 140 अब्जाधीशांची एकूण संपत्ती जोडली तर हा आकडा जवळपास 596 डॉलर म्हणजे 44.28 लाख कोटी रुपयाच्या घरात जात असल्याची माहिती आहे.

Related Stories

जूनच्या सुरुवातीला 5-जी स्पेक्ट्रमचा लिलाव होण्याचे संकेत

Amit Kulkarni

‘ऍपल’चे बाजारमूल्य 3 ट्रिलियन डॉलरसमीप

Amit Kulkarni

विदेशी गुंतवणूकदारांनी 4 हजार कोटी काढले

Patil_p

अर्थव्यवस्थेला एक धक्का और दो

Omkar B

देशातील निर्यात 36.47 टक्क्मयांनी घसरली

Patil_p

बुलंद बेत…‘रिलायन्स’ नि ‘टाटा’चे!

Omkar B
error: Content is protected !!