Tarun Bharat

श्रीराम कथा

रावण रामाच्या दिशेने आपल्या उरल्यासुरल्या सैन्यासह चालून येत होता. रावणाच्या बाजूला आधीच हनुमानाने लावलेल्या आगीमुळे जणू आगीची भिंतच उभी राहिली होती. रावण घोडय़ाला दामटत येत होता. तेव्हा काही बाण त्याच्या मांडीत घुसत होते. ती आगीची भिंत त्याने घोडय़ासकट ओलांडून रामाच्या दिशेने उडी मारली. रावणाने आपली चंद्रहास तलवार त्याच्या दिशेने उचलली तेव्हा हनुमानाने उडी मारून रावणाचे दोन्ही पाय धरले आणि रावणाचा तोल गेला. तो घोडय़ावरून खाली पडला. तेव्हा रावणाने हनुमानाच्या नाकावर ठोसा मारला. तेव्हा तो समुद्रात जाऊन पडला. तेव्हा रावण तलवार परजत तो रामलक्ष्मणावर धावून गेला. एवढय़ात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडू लागला. मोठमोठय़ा लाटा सेतूवर आदळू लागल्या. पायाखाली सारे काही निसरडे झाल्याने हालचालीही निसरडय़ा होत होत्या. नेम चुकत होते. पण संतापाच्या भरात रावणाने केलेली चूक त्याच्या उशिरा लक्षात आली. मागे लागलेली आग पावसामुळे विझली होती. रावणाच्या बाजूने लढाई करत पुढे येणाऱया बिभिषणाचा त्याला विसर पडला होता. अग्नीचा अडथळा नसल्याने तो लपतछपत रावणापर्यंत पोचला होता. त्याने आपली तलवार रावणाच्या पाठीत खोलवर घुसवली. रावण वळला आणि त्याच्यावर वार करणार एवढय़ात बिभिषण खाली वाकला आणि रावणाचा तोल गेला. तेव्हा बिभिषणाने लाथ मारून त्याला समुद्रात उडवले.तीच संधी साधून राम लक्ष्मणाने बाणांचा वर्षाव सुरू केला. रावणाला अशक्त वाटू लागले. त्याने रामाकडे वळून त्याची तलवार परजून सेतूच्या दिशेने गेला. तेव्हा बिभिषण तिथे आधीच जाऊन पोचला होता. त्याने रावणावर पुन्हा तलवारीचा मानेवर वार केला. तेव्हा चिलखत घातलेल्या रावणाने त्याला लाथ मारली नि बिभिषण समुद्राच्या लाटात पडून कुठे नाहीसा झाला ते कळले नाही.

रावण पुन्हा जेव्हा रामाकडे वळला, तेव्हा त्याचे चिलखत गळून पडले होते, तो उघडा पडला होता. आता अधिक जोरदार बाणांचा हल्ला त्याच्यावर होऊ लागला. हनुमानाने त्याला आणून दिलेला तीर रामाने अचूकपणे रावणाच्या पोटावर नेम धरून बरोब्बर नाभीत मारला. त्याच्या शरीरातून रक्त ठिबकत होते. डोळे गरगरू लागले. पावले अडखळू लागली आणि हालचाली मंदावल्या. बाणामागून बाण त्याचे शरीर जर्जर करीत होते. त्याच्या डोळय़ासमोर हिरव्यानिळय़ा लाटा दिसू लागल्या आणि तो जमिनीवर कोसळला. सारे धूसर दिसू लागले. डोळे उघडल्यावर त्याला पृथ्वी काळीशार आणि थंड भासत होती. भोवती मरणशांतता पसरली होती. काही माणसे त्याच्या भोवती होती. मग एक काळी आकृती त्याच्याजवळ आली…‘रा…म’..राम त्याला स्वर्गात जागा मिळण्याविषयी तोंडात काहीतरी पुटपुटत होता.

Related Stories

दंतकथांचा महानायक!

Amit Kulkarni

कालिदासाचे मेघदूत…एक खंडकाव्य (18)

Patil_p

मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार का गेले?

Patil_p

अमेरिकेत नवा प्रारंभ

Amit Kulkarni

सुन री सखी

Patil_p

सण निरागस हो

Patil_p