Tarun Bharat

श्रीराम सेना हिंदूस्थान संघटनेच्या कार्यकर्त्यांचे कौतुकास्पद कार्य

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव जिल्हय़ात कोरोनाचा संसर्ग झपाटय़ाने वाढला आहे. या कोरोना महामारीच्या काळात नागरीक भयभित झाले असून त्यांना ऑक्सिजन, बेड, औषधे, रूग्णवाहिका यांची कमतरता भासत आहे. या सर्वात गोरगरीब जनता भरडली जात आहे. या काळातही श्रीराम सेना हिंदूस्थान ही संघटना समाजात उत्तम कार्य करीत आहे. रूग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचविणे, कोरोना मृत रूग्णांवर अंत्यसंस्कार करण्याचे कार्य या संघटनेचे कार्यकर्ते दिवसरात्र करीत आहेत.

कोरोनामुळे रूग्णांचे कुटुंबियही अंत्यसंस्काराला येण्यास टाळाटाळ करीत आहेत. परंतु श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत 20 ते 25 कोरोना रूग्णांवर अंत्यसंस्कार केले आहेत. कित्येक रूग्णांना रात्री अपरात्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. श्रीराम सेनेच्या तीन रूग्णवाहिका असून त्यांच्यामार्फत आतापर्यंत शेकडो रूग्णांना रूग्णालयापर्यंत पोहोचविण्यात आले आहे. याखेरीज संघटनेच्या माध्यमातून ऑक्सिजन सिलिंडर गरजुंना जेवणाची मोफत सोय देण्यात आली आहे. श्रीराम सेनेचे कार्यकर्ते विनायक पाटील, शंकर पाटील, श्रीकांत कुऱहय़ाळकर, महेश जाधव, भरत नागरोळी, राजेंद्र बैलूरकर, अभिषेक पुजारी, संदीप कामुले, सुदेश लाटे, बाबु नावगेकर यांनी उत्तम सेवा बजावली आहे. त्यांनी केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मनामध्ये कोणतीही भिती न बाळगता त्यांनी अनेकांना जीवदान दिले आहे. यापुढेही श्रीराम सेनेचे कार्य असेच सुरू राहिल असे पदाधिकाऱयांनी सांगितले

Related Stories

शिवाजी विद्यापीठाच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा लाभ घ्या

Amit Kulkarni

गोकाकचा धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित

Amit Kulkarni

कडोलीत खासदार अमोल कोल्हे यांचे झाले जल्लोषी स्वागत

Sandeep Gawade

कुदेमानी येथील बैलगाडा शर्यतीत बेटगिरीची बैलजोडी प्रथम

Amit Kulkarni

खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी मजहर खानापुरी

Tousif Mujawar

निपाणीत हुतात्मादिन गांभीर्याने

Patil_p