Tarun Bharat

श्रीलंका-विंडीज पहिली कसोटी आजपासून

वृत्तसंस्था/ कोलंबो

यजमान लंका-विंडीज यांच्यातील पहिली कसोटी सामना आजपासून (रविवार दि. 21) येथील गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू होणार आहे. सदर मालिका आयसीसीच्या कसोटी चॅम्पियन्स स्पर्धांतर्गत राहील. या मालिकेसाठी शनिवारी लंकन क्रिकेट मंडळाने 22 जणांचा संघ जाहीर केला असून त्यामध्ये चरिथ असालंकाचा समावेश करण्यात आला आहे.

या मालिकेसाठी लंकेचे नेतृत्व डी. करुणारत्नेकडे सोपविण्यात आले आहे. काही वैयक्तिक समस्येमुळे बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत उपलब्ध न झालेल्या डी. चमिराचा या मालिकेसाठी लंकन संघात समावेश करण्यात आला आहे. सँडेकेन, लसिथ इम्बुलडेनिया हे लंकन संघातील प्रमुख फिरकी गोलंदाज आहेत. उभय संघातील पहिली कसोटी रविवारपासून सुरू होणार आहे. तर या मालिकेतील दुसरी आणि शेवटची कसोटी गॅलेमध्ये 29 नोव्हेंबरपासून खेळविली जाईल.

लंकन कसोटी संघ- दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), ओशादा फर्नांडो, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल, धनंजय डिसिल्वा, पथूम निसांका, चरिथ असालंका, मिनोद भानुका, रोशन सिल्वा, कमिल मिशारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, लक्षण संदकन, लसिथ इम्बुलडेनिया, प्रवीण जयविक्रमा, सुमिंदा लक्षण, सुरंगा लकमल, विश्वा फर्नांडो, दुष्मंता चमिरा, लहिरु कुमारा, असिथा फर्नांडो आणि चमिका गुणसेकरा.

Related Stories

गोविंद उपउपांत्यपूर्व फेरीत, निशांत दुसऱया फेरीत

Amit Kulkarni

हंगेरी जीपीमध्ये रेड बुलचा व्हर्स्टापेन विजेता

Patil_p

टी-20 मध्ये स्लो ओव्हररेटवर आणखी निर्बंध

Patil_p

ऑस्ट्रेलियन संघात मॉरिस, नेसरला स्थान

Patil_p

जेव्हा लाईव्ह टीव्हीवर प्रशिक्षक तिला प्रपोज करतो!

Patil_p

दक्षिण आफ्रिकेला 213 धावांची आघाडी

Patil_p