Tarun Bharat

श्रीलंकेचा पहिला डाव 212 धावांत खुर्दा

नॅथन लियॉनचे 5 बळी, ऑस्ट्रेलिया दिवसअखेर 3 बाद 98

गॅले / वृत्तसंस्था

नॅथन लियॉनने कारकिर्दीत 20 व्यांदा डावात 5 बळी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाने येथील पहिल्या कसोटी सामन्यात यजमान लंकेचा पहिला डाव 59 षटकात सर्वबाद 212 धावांवर गुंडाळला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने बुधवारी दिवसअखेर 3 बाद 98 धावांपर्यंत मजल मारली.

श्रीलंकन ऑफस्पिनर रमेश मेंडिसने डेव्हिड वॉर्नरला (25) पायचीत केले तर मार्नस लाबुशानेला (13) असिथा फर्नांडोकरवी झेलबाद केले. या पडझडीमुळे ऑस्ट्रेलियाची एकवेळ 2 बाद 35 अशी खराब सुरुवात झाली होती. नंतर उस्मान ख्वाजासह धाव घेताना समन्वयात गोंधळ उडाल्यानंतर स्टीव्हन स्मिथ (6) धावचीत झाला. दिवसअखेर ख्वाजा 47 तर ट्रव्हिस हेड 6 धावांवर खेळत होते.

तत्पूर्वी, लियॉन (90 धावात 5 बळी) व मिशेल स्वेप्सन (3-55) यांनी एकत्रित 8 बळी घेत लंकेच्या डावाला जोरदार सुरुंग लावला. लंकेतर्फे निरोशन डिकवेलाने सर्वाधिक 58 धावांचे योगदान दिले. त्याचे हे कसोटी क्रिकेटमधील 21 वे अर्धशतक ठरले. त्याने अँजिलो मॅथ्यूजसह (39) सहाव्या गडय़ासाठी 42 धावांची भागीदारी साकारली. लंकेने त्यापूर्वी निम्मा संघ 97 धावांमध्ये गमावला होता. लंकेने या लढतीत नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका पहिला डाव ः 59 षटकात सर्वबाद 212 (निरोशन डिकवेला 59 चेंडूत 6 चौकारांसह 58, अँजिलो मॅथ्यूज 71 चेंडूत 3 चौकारांसह 39, दिमुथ करुणारत्ने 84 चेंडूत 3 चौकारांसह 28, पथूम निस्सांका 44 चेंडूत 3 चौकारांसह 23, रमेश मेंडिस 36 चेंडूत 3 चौकारांसह 22. अवांतर 11. नॅथन लियॉन 25 षटकात 5-90, स्वेप्सन 3-55, कमिन्स व स्टार्क प्रत्येकी 1 बळी).

ऑस्ट्रेलिया पहिला डाव ः 25 षटकात 3 बाद 98 (उस्मान ख्वाजा 86 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 47, डेव्हिड वॉर्नर 24 चेंडूत 5 चौकारांसह 25, मार्नस लाबुशाने 13. रमेश मेंडिस 2-35).

Related Stories

युनूस खानकडून प्रशिक्षकपदाचा त्याग

Patil_p

सुर्यकुमार यादव पहिल्या लढतीतून बाहेर?

Patil_p

इराणी करंडक क्रिकेट सामना 1 ऑक्टोबरपासून

Patil_p

मोनिकाचा वर्ल्ड चॅम्पियनला धक्का,

Patil_p

क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघासाठी मानसोपचार तज्ञ नेमणार

Patil_p

जितके जवळ होतो, तितकेच दूर राहिलो!

Patil_p