Tarun Bharat

श्रीलंकेचा रुपया गडगडला

एक कप चहा 100 रुपयावर : डॉलरच्या तुलनेत रुपया नरमाईत

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

भारताचा दक्षिणेकडील शेजारी देश श्रीलंकेमध्ये स्वातंत्र्यांनंतर आता सर्वात मोठय़ा आर्थिक संकटाला तेंड द्यावे लागत आहे. तेथे महागाई दर 17 टक्क्यांवर पोहोचला आहे. श्रीलंकेत एक कप चहाची किमत 100 रुपयाच्या घरात पोहोचली आहे. बेडच्या पाकिटासाठी जवळपास 150 श्रीलंकन रुपये द्यावे लागत आहेत.

सदरची स्थिती निर्माण होण्याचे मुख्य कारण हे डॉलरच्या तुलनेत श्रीलंकन रुपयाचे मूल्य घसरल्याचा फटका बसला आहे. मार्च महिन्यात ही डॉलरच्या तुलनेतील मूल्य हे 46 टक्क्यांनी गडगडल्याचे पहावयास मिळाले आहे. मार्च महिन्यात 1 डॉलरचे मूल्य हे 201 श्रीलंकन रुपयापेक्षा वाढून 295 रुपयावर पोहोचले आहे. यामुळे या देशातील महागाईचा दर वाढत आहे.

 आर्थिक स्थिती बिकट

भारताचा शेजारी देश म्हणून ओळख असणाऱया श्रीलंकेत सर्वसामान्य जनता भूकेने व्याकूळ झाली आहे. कारण त्यांना 290 रुपये साखर, 500 रुपये किलो तांदूळ खरेदी करावा लागत आहे. पेट्रोल पंपांवर तर सैन्य तैनात करावे लागले आहे.

डॉलरच्या तुलनेत कसे निश्चित होते मूल्य

डॉलरच्या तुलनेत कोणत्याही अन्य चलनाचे मूल्य घटल्यानंतर त्या चलनामध्ये घसरण होण्यास सुरुवात होते. इंग्रजीमध्ये याला करन्सी डेप्रीशिएशन असे म्हणतात. प्रत्येक देशाजवळ विदेशी चलनाचा साठा असतो. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण होत असते. विदेशी चलन साठा घटला आणि वाढत गेल्याने संबंधीत देशाच्या चलनाची दिशा निश्चित होते.

Related Stories

जेएसडब्लू स्टीलचे उत्पादन 7 टक्क्यांनी वाढले

Omkar B

भारतात टिकटॉकला उतरती कळा?

Patil_p

2019-20 मध्ये सोने आयात घटली

Patil_p

व्होडाफोन आयडियाने फेडले 2700 कोटी

Patil_p

महामारीनंतर नवीन वर्षात निर्यात वाढण्याचे संकेत

Patil_p

‘व्हॉट्सऍप’ ऍप डाऊनलोडमध्ये नोंदवली घट

Patil_p