Tarun Bharat

श्रीलंकेत बुरख्यावर बंदी, मदरसेही होणार बंद

ऑनलाईन टीम / कोलंबो : 

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने श्रीलंकेत बुरख्यावर बंदी घालण्यात येणार आहे. तसेच एक हजारांहून अधिक मदरसेही बंद करण्यात येणार असल्याची माहिती श्रीलंकेचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री सरथ वीरासेकरा यांनी दिली.

वीरासेकरा म्हणाले, बुरख्यावर बंदी घालण्याचा श्रीलंका सरकारने निर्णय घेतला आहे. या प्रस्तावावर मी स्वाक्षरी केली असून, मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी तो प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर संसद त्यावर कायदा करू शकते.

सुरुवातीच्या टप्प्यात देशातील मुस्लिम मुली आणि महिलांनी कधीही बुरखा घातला नव्हता. गेल्या काही वर्षांत हा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे वाढता धार्मिक मूलतत्त्ववाद. त्यामुळे ही बंदी आहे. उल्लेखनीय बाब ही आहे की, अनेक देशांनी यापूर्वी बुरख्यावर बंदी घातली आहे.

Related Stories

चीन : 15 नवे रुग्ण

Patil_p

भारतीय गायींच्या मदतीने नैराश्यावर उपचार

Patil_p

कोलंबो पोर्ट सिटीवरही चीनचा कब्जा

Patil_p

अमेरिका-रशियामध्ये करार

Omkar B

इम्रान खान यांचे आसन डळमळीत ?

Patil_p

अमेरिकेशी ‘सुरक्षा हमी’वर चर्चेची रशियाची तयारी

Amit Kulkarni