Tarun Bharat

श्रीलंकेत महागाईचा भडका; अन्नधान्याची टंचाई

ऑनलाईन टीम/तरुण भारत

श्रीलंकेत महागाईचा भडका उडाला आहे. अन्नधान्याची टंचाई निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात किमती वाढल्या आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये महागाई दर आतापर्यंतचा सर्वात जास्त आहे. श्रीलंकेतील महागाई दर हा १२.१ टक्क्यांपर्यंत वाढल्याने खाद्यपदार्थांच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहे. नोव्हेंबर २०२१ च्या तुलनेत डिसेंबर महिन्यात २.२ टक्क्यांनी महागाई वाढली आहे.

श्रीलंकन न्यूज रेडिओने याबाबत वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार कोलंबो ग्राहक किंमत निर्देशांकातील बदल, जो वार्षिक सरासरीच्या आधारावर मोजला तो नोव्हेंबरमध्ये ५.३ टक्क्यांवरून डिसेंबरमध्ये तब्बल ६ टक्क्यांपर्यंत वाढला. यावर एक निवेदन जारी करत सेंट्रल बँकेने म्हटले आहे की पुरवठा साखळीतील घटक महागाई वाढण्यास मुख्य कारणीभूत आहेत. दर महिन्याला खाद्य आणि इतर या दोन्ही श्रेणीतील वस्तूंच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याने महागाई वाढली आहे, असे न्यूजरेडिओने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

Related Stories

केरळमध्ये प्लाझ्मा थेरपी वापरण्यास मान्यता

prashant_c

बांगलादेशातहिंदुंच्या घरांची तोडफोड

Patil_p

दहशतवादविरोधी केंद्रावरच दहशतवाद्यांचा कब्जा

Patil_p

महाराष्ट्रात 10 वीचा निकाल 31 जुलैपर्यंत, तर 12 वीचा 15 ते 20 जुलै दरम्यान

Tousif Mujawar

अमेरिकेत कोरोनाची त्सुनामी

Patil_p

चिंताजनक! महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांनी ओलांडला 59 लाखांचा टप्पा

Tousif Mujawar