Tarun Bharat

श्रीलंकेने देशव्यापी लॉकडाऊन उठवला

ऑनलाईन टीम / कोलंबो :

कोरोनाचा धोका कमी झाल्याने श्रीलंकेने देशव्यापी लॉकडाऊन उठवला आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या कार्यालयाकडून यासंदर्भात निवेदन जारी करण्यात आले आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने श्रीलंकेत 20 मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात सामूहिक संसर्गाचा धोका नसल्याने रविवारी श्रीलंका सरकारने देशव्यापी लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतला आहे. आता देशात निवडक संचारबंदी लागू असेल. विशेषतः आता रात्रीच्या वेळेतील संचारबंदी कायम असेल. 

आंतरराष्ट्रीय विमानसेवा 1 ऑगस्ट रोजी खुली करणार असल्याचे श्रीलंका सरकारने म्हटले होते. मात्र, आता त्याला विलंब होण्याची शक्यता आहे. श्रीलंकेत आतापर्यंत केवळ 2037 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 1678 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, 348 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

Related Stories

सेनेचे 10 खासदारही बंडखोरीच्या तयारीत, भाजप खासदाराचा दावा

datta jadhav

एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ

Archana Banage

यूपी : 7 जूनपासून प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी ‘स्पेशल लसीकरण बूथ’

Tousif Mujawar

‘काँग्रेसमुक्त भारत’ हे ममता-भाजपचे स्वप्न

datta jadhav

आर्मेनिया-अझरबैजान युद्धात 3 हजार जणांचा मृत्यू

datta jadhav

व्वा! उद्योगपती आनंद महिंद्राना कोल्हापुरच्या फोटोने घातली भुरळ, हा फोटो केला ट्विट

Archana Banage