Tarun Bharat

श्रीस्थळचा वार्षिक भजनी सप्ताह 1 ऑगस्ट पासून सुरू

प्रतिनिधी /काणकोण

श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देव अडवट सिंहासनाधिश्वर महापती काणकोण येथील वार्षिक अखंड भजनी सप्ताहाला 1 ऑगस्ट पासून सुरूवात होत असून 7 ऑगस्ट रोजी या सप्ताहाची सांगता होणार आहे. कोरोनाची महामारी अजूनही ओसरलेली नसून मागच्या वर्षी प्रमाणे यंदा देखील सरकारने जे निर्बंध घालून देण्यात आलेले आहेत. त्याचे पालन करण्याचे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.

  या सात दिवसांत विविध समाज बांधवांकडून भजनी पार आणि पुजा केली जाते. त्यानुसार 1 ऑगस्ट रोजी दैवज्ञ ब्राम्हण समाज, 2 रोजी कोमरपंत समाज, 3 रोजी स्थळवासी, 4 रोजी ब्राम्हण व वेळीप समाज, 5 रोजी वैष्णव समाज, 6 रोजी किंदळेकर देसाई समाज आणि 7 रोजी नगर्सेकर समाजा तर्फे भजनी पार आणि पुजेचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे.

  श्रीस्थळच्या श्री मल्लिकार्जुन देवस्थानातील वार्षिक भजनी सप्ताह हा गोव्यातील काही प्रमुख उत्सवांपैकी एक असून यापूर्वी गोवा तसेच महाराष्ट्रातील नामवंत गायकांचे कार्यक्रम या भजनी सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले आहेत. मात्र, मागच्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे सर्वच धार्मिक कार्यक्रमावर बंधन आले असून अत्यंत मर्यादित स्वरूपातच हा सप्ताह साजरा केला जाणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यानी दिली.

Related Stories

नारळाचा दर खूपच घसरल्याने बागायतदार हवालदिल

Amit Kulkarni

व्यापार परवाना शुल्कावर बैठकीत अंतिम निर्णय झालेला नाही

Patil_p

फोगट प्रकरणातील संशयिताला ‘व्हीआयपी’ पाहुणचार?

Amit Kulkarni

अर्धफोंडपाठोपाठ माशे पुलाच्या दुरुस्तीला प्रारंभ

Amit Kulkarni

मेरशी येथे जॅक सिक्वेरा यांच्या पुतळा परिसराचे सौंदर्यीकरण

Patil_p

गोवा अमलीपदार्थ मुक्त राज्य बनवावे

Amit Kulkarni