Tarun Bharat

‘श्री गवळादेवी’चा आज पासून जत्रोत्सव

प्रतिनिधी / सांगे

कर्नाटक आणि गोवा राज्यातील प्रसिद्ध श्री गवळादेवी देवस्थान, बाजारकुणंग ग्रामपंचायत क्षेत्रातील जोयडा तालुक्मयातील म्हायरे येथील प्रसिद्ध ‘श्री गवळादेवी जत्रा’ यंदा शुक्रवार दि. 26 मार्च रोजी संपन्न होत असून उत्तर कन्नडा जिल्हय़ातील या वार्षिक जत्रेला दरवषी हजारो भाविक देवीच्या दर्शनाला उपस्थिती लावत असतात  यंदाचा उत्सव हा कोरोना महामारीच्या सावटाखाली होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे.

दिग्गी-म्हायरे येथील ही प्रमुख व प्रसिद्ध जत्रा आहे. मंदिरामध्ये वारूळरूपी मूर्ती आहे. सहय़ाद्रीच्या डोंगर माथ्यावर वसलेले हे मंदिर निसर्गाचा सुंदर आविष्कार घडवीत असून मन प्रसन्न करून सोडते. दि. 26 मार्च रोजी सकाळी 8 वाजता मूर्ती स्थापना व पूजा कार्यक्रम, 9 वाजता ज्ञानेश्वरीच्या 9 ते 12 अध्ययाचे वाचन, दुपारी 3 वाजता गाथाकथन, 4 वाजता प्रवचन नंतर रामजप, 7 ते 8 या वेळेत विठ्ठल महाराज यांचा हरिपाठ, रात्री 9 ते 12 कीर्तनकार नागराज महाराज यांचे कीर्तन नंतर संगीत संप्रदायिक जागर-भजन, त्यानंतर दि. 27 मार्च रोजी पहाटे काकड आरती नंतर काला-कीर्तन व  नंतर मंदिराभोवती दिंडी प्रदक्षिणा – माणिकराव गावकर यांचा कार्यक्रम होणार आहे.

मुख्य कार्यक्रम शनिवार दि 27 रोजी दुपारी 12  वाजता देवीला साडी अर्थात चीरा नेसविणे, त्यानंतर आशीर्वाद व तीर्थ-प्रसाद. संध्या. 6 ते 7 पर्यंत भजन मंडळी सिसय यांचे भजन, रात्रौ 9 ते 11 वाजता देवस्थान फळ फळावलीचा लिलाव (पावणी), 12 वाजता श्री ओंकार थियेटर प्रस्तुत संगीत पौराणिक नाटक ‘ययाती आणि देवयानी’ सादर होणार आहे.

गोवा आणि कर्नाटक राज्यातील सीमेवर असलेल्या जोयडा तालुक्मयातील कारवार जिह्यातील या जत्रेला दुसऱया दिवशी गोव्यातून हजारो भाविक जात असतात. यामध्ये सांगे, कुळे, मोले, धारबंदोडा, सावर्डे, कुडचडे, नेत्रावली तसेच केपे येथिल भाविकांचा जास्ती समावेश असतो. एक काळ असा होता की जेव्हा दळणवळणाची साधने नव्हती, त्याकाळी दिगी घाटातील पायवाटा, रस्त्याचा वापर करून जंगलातुन पायी चालत कर्नाटकातील लोकं गोव्यात तर इथले कर्नाटकात जात असे. त्यापैकीच चोर्ला, रामघाट, दिगी घाटाचा समावेश असून या मार्गाने व्यापाराची देवाण घेवाण करण्यासाठी उपयोग होत असे. दिगी घाट हा कर्नाटकातील सुपा जाण्यासाठी अगदी कमी अंतराचा रस्ता आहे. सुपा ते दिगी हा रस्ता अत्यंत अरुंद असून पूर्णतः मातीचा आहे. हा रस्ता नेत्रावली अभयारण्यातून जात असून धारगिनी येथे वन खात्याची गेट आहे. या रस्त्याचा अगदी बऱयाच काळापासून वापर होत असे. कर्नाटकातील दिगी, सुपा व  पुढे कुंभारवाडा पर्यंत जुन्या रस्त्याचा वापर करून जाता येते. जुना रस्त्यातून प्रवास केल्यानंतर डोंगर ओलांडल्यानंतर दिगी, कुदे, मिवाय गावे येतात तर जुना गावच्या पायथ्याशी पाटे, तुडव व मावलिंगे, धारगिनी ही गांवे येतात.

उगे गावातून पुढे गेल्यानंतर धारगिनी व नंतर जुना येथून श्री गवळादेवी जत्रेला जावे लागते. जुना हा गावं गोव्यात येत असून तेथे जेमतेम चार ते पाच घरे आहेत. याच उगे-जुना घाट मार्गे श्री गवळादेवी जत्रेला गोव्यातून भाविक जातात. देवीला नवस फेडण्यासाठी भाविक दुचाकी, चारचाकी वाहनाने सुमारे 25 किलोमीटर अंतर कापून अगदी अरुंद व ओबड धोबड मार्गाने भाविक देवीच्या दर्शनाला जातात. पूर्णपणे जंगलातून जाणारा हा रस्ता आहे. अधून मधून पक्ष्याची किलबिलाट, जना वरांचा आवाज ऐकू येतो. उगे -जुना ते दिगी पर्यंत मातीचा रस्ता आहे. त्याची सुधारणा करून डांबरीकरण केल्यास गोवा व कर्नाटकतील लोकांची चांगली सोय होऊ शकते असे ग्रामस्थ्यांचे म्हणणे आहे.

गोवा सरकारने त्यादृष्टीने अभ्यास व पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. मंदिराच्या शेजारी तळी असून तिचे पाणी नित्य उपलब्ध असते. गोव्यातील काही भाविक अनमोड घाट काडून तेथील मार्गातून जातात. येथे मुलांची खेळणी, मिठाई, इत्यादी फेरीही भरते. यंदा मात्र कोरोनामुळे जत्रा सरकारी निर्बंधात साजरी करावी लागणार आहे.

Related Stories

नागरिक कायद्याबाबत जनजागृतीसाठी घरोघरी पत्रके वाटणार

Patil_p

प्रमोद सावंत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री

Archana Banage

सांखळी नगराध्यक्षपदासाठी आज निवडणूक

Amit Kulkarni

नास्नोडा पंचायत सचिवाला शिवीगाळप्रकरणी 5 जणांना अटक

Omkar B

शुक्रवारच्या बाजाराला पुरुमेंतच्या खरेदीला म्हापशात नागरिकांची झुंबड

Omkar B

पाळोळे येथील प्रसाधनगृहाचे उद्या उद्घाटन

Amit Kulkarni