Tarun Bharat

श्री.छ. सौ.चंद्रलेखाराजे अनंतात विलीन

प्रतिनिधी/ सातारा

 सातारच्या राजघराण्यातील स्नुषा श्री.छ.सौ.चंद्रलेखाराजे यांच्या पार्थिवावर आज सकाळी शोकाकुल वातावरणात संगम माहुली येथील राजघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांचे नातू कौस्तुभादित्यराजे यांच्या हस्ते भडाग्नी देण्यात आला.अंत्ययात्रा  अदालतवाडा येथून काढण्यात आली.अंत्ययात्रा संगम माहुली येथे पोहचल्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्री.छ.सौ.चंद्रलेखाराजे यांच्या निधनाने संपुर्ण सातारा नगरी शोकसागरात बुडाली.सकाळी सजवलेल्या वाहनातून त्यांचे पार्थिव पालखीत बसवून अंत्ययात्रा संगम माहुली येथे पोहचली.संगम माहुली येथे पोहचल्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, त्यांचे पती शिवाजीराजे भोसले यांनी विधी केला.कौस्तुभादीत्यराजे यांनी भडाग्नी दिला.अंत्ययात्रेत उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक अमोल मोहिते, शंकर माळवदे यांच्यासह सातारा शहरातील नागरिक सहभागी झाले होते.

Related Stories

”आरक्षण मुद्यावरुन केंद्र सरकारला पळ काढता येणार नाही”

Archana Banage

चार दिवस दिलेली मृत्यूशी झूंज अखेर व्यर्थ..!

Archana Banage

सातारा : सागर भिसेंनी पदवीधरमधून भरला अर्ज

Archana Banage

Satara : पाचगणी पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्यावर काळे द्रव्य अंगावर टाकून हल्ला

Abhijeet Khandekar

obc reservation: काँग्रेसने सत्तेबाहेर पडावं; चंद्रशेखर बावनकुळेंचा सल्ला

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात लॉकडाऊनला 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढ

Archana Banage