Tarun Bharat

‘श्री दामबाबा’चा गुलालोत्सव 29 रोजी

प्रतिनिधी /मडगाव

संपूर्ण गोवा तसेच शेजारील महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जांबावली येथील श्री दामोदराचा (दामबाब) गुलालोत्सव मंगळवार दि. 29 मार्च रोजी संध्याकाळी 3.30 वा. साजरा केला जाणार आहे. दरम्यान, जांबावलीच्या शिशिरोत्सवाला आज बुधवार दि. 23 मार्च पासून प्रारंभ होत असून त्यांची सांगता बुधवार दि. 30 मार्च रोजी होणार आहे.

आज बुधवार दि. 23 रोजी रात्री 9.30 वा. जांबावली येथे श्री दामोदराचा हळदुण्याचा कार्यक्रम आणि कोंबवाडा-मडगाव येथील वै. पुरूषोत्तम पां. केणी यांच्या घरी नारळाची पूजा. गुरूवार दि. 24 रोजी संध्याकाळी 5.30 वा. विठ्ठलवाडीहून बॅण्ड वादनासहीत हरदास त्रिविक्रम पै. रायतूरकर यांच्या निवास्थानी प्रयाण. सायंकाळी 6 वा. कोंबवाडा येथील वै. पु. पां. केणी यांच्या घरी पुजलेल्या नारळाची भव्य मिरवणूक जांबावली येथे श्री दामोदर संस्थाना पर्यंत जाणार आहे. त्यानंतर रात्री 11 वा. सं. ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा प्रयोग होईल.

शुक्रवार दि. 25 रोजी रात्री 9.30 वा. फ्रायडे सुपरस्टार प्रस्तुत कोकणी नाटक ‘बारा चल घरा’. शनिवार दि. 26 रोजी रात्री 9.30 वा. जांबावली शिशिरोत्सवा निमित्त मठग्रामस्थ हिंदु सभा कला विभाग तर्फे ‘अप्सरा आयल्यो दामबाबाच्या भेटीक’ हा नाटय़प्रयोग सादर केला जाणार आहे. रविवार दि. 27 रोजी रात्री 10 वा. तीन अंकी नाटक ‘मृत्युंजय’ सादर केले जाणार आहे.

सोमवार दि. 28 रोजी सायंकाळी 6 वा. फॅन्सी ड्रेस स्पर्धा-रिकॉर्ड डान्स स्पर्धा (मर्यादित प्रवेश) दोन्ही स्पर्धासाठी गट ः सात ते चौदा पर्यंत. त्यानंतर रात्री 9 वा. लावण्यतारका हा ‘लावणी’चा कार्यक्रम होईल. पहाटे 3 वा. संगीत पौराणिक नाटक ‘पंढरपूर’ सादर करण्यात येईल.

मंगळवार दि. 29 मार्च रोजी संध्याकाळी 3.30 वा श्री दामोदराचा गुलालोत्सव होईल. गुलालोत्सवासाठी भक्तांनी फक्त लाल रंगाचा गुलाल वापरावा असे आवाहन मठग्रामस्थ हिंदु सभे तर्फे करण्यात आले आहे. गुलालोत्सवानंतर रात्री 11 वा. ‘नवरदेवाची वरात’ निघणार आहे. त्यानंतर रात्री 12 वा. सदाबहार संगीताचा कार्यक्रम ‘संगीत सभा’ होईल.

बुधवार दि. 30 रोजी सकाळी 10 वा. होणाऱया ‘धुळपेट’ने जांबावलीच्या शिशिरोत्सवाची सांगता होईल. भाविकांनी मोठय़ा संख्येने यंदाच्या शिशिरोत्सवाला तसेच श्री दामबाबाच्या गुलालोत्सवाला उपस्थित रहावे असे आवाहन मठग्रामस्थ हिंतु सभे तर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

मगो पक्ष बाराही तालुक्यात शिमगोत्सव साजरा करण्यास तयार

Amit Kulkarni

जीएसटीपोटी 750 कोटी परताव्याची केंद्राकडे मागणी

Omkar B

कोरोना चाचणी विभाग आता फोंडय़ात सुरु

Omkar B

बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येचा निषेध

Amit Kulkarni

तारीवाडा माशेल येथे रस्त्यांची दुर्दशा

Amit Kulkarni

केपे मतदारसंघात 83.45 टक्के मतदान

Amit Kulkarni