Tarun Bharat

श्री समर्थ रामदास स्वामी पुरस्कार स.भ. मनिषा बाठे यांना जाहीर

प्रतिनिधी/ सातारा

सज्जनगड येथील श्रीरामदास स्वामी संस्थानतर्फे श्री समर्थ रामदास स्वामी पुरस्कार पुणे येथील स.भ.मनिषा बाठे यांना जाहीर करण्यात आला आहे. श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या समाज प्रबोधन कार्यास अनुसरुन कार्य करणाऱया व्यक्तीस अगर संस्थेस संस्थानच्यावतीने  1992 पासून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो, अशी माहिती श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगडाचे अध्यक्ष सू.ग.स्वामी यांनी पत्रकाद्वारें दिली आहे.

मनिषा बाठे यांनी किशोरवयातच अनुग्रह घेवून रामदासी संप्रदायाच्या प्रसाराच्या कार्यास सुरुवात केली. ठिकठिकाणी उपासना वर्ग चालवणे, रामदासी संस्कार शिबिराचे आयोजन करतात. निरनिराळय़ा स्पर्धा आयोजित करुन मुलांना शालेय वयात समर्थ साहित्याचा परिचय घडवणे, ग्रंथप्रदर्शने मुलांसाठी सुलेखन आणि चित्रकला वर्गाचे आयोजन करणे अशा अनेक उपक्रमातून रामदासी सांप्रदाय, रामदासी विचारांच्या प्रचार आणि प्रसारांचे कार्य त्या करत आहेत. गेली 12 वर्ष त्या सातत्याने रामदास स्वामी आणि त्यांच्या शिष्यांच्या अप्रकाशित हस्तलिखीतांवर संशोधन करत आहेत. समर्थ रामदासकृत दखनी उर्दू पदावल्या, रामदासी ज्ञानोपासना आणि पंचीकरण, रामदासी मोक्षपट आणि वारकरी मोक्षपट एक तौलनिक मागोवा, समर्थ रामदासकृत देवीची 31 स्त्राsत्रे, रामदासी गणेशविद्या असे अनेक संशोधनपर ग्रंथलेखन त्यांनी केले आहे. निरनिराळय़ा राज्यांमध्ये जाऊन त्या विविध भाषेतील दत्परांचा अभ्यास करत असतात. विविध दैनिकांतून त्यांचे रामदासी वाड्मय आणि संप्रदाय यावर लेखन सुरु असते. आकाशवाणीसाठी त्या नियमित लेखन करत असतात. त्यांच्या संशोधनासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट संशोधन पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना श्रीरामदास स्वामी संस्थान यांच्यावतीने देण्यात येणारा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे म्हटले आहे.

Related Stories

सेनेतील १५ आमदारांना उध्दव ठाकरेंचे भावनिक पत्र; म्हणाले,शिवसेनेला बळ दिलेत…

Abhijeet Khandekar

पुसेगावच्या शासकीय विद्यानिकेतनला गतवैभव मिळणार

Archana Banage

कोल्हापूर : जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘अनलॉक’ ची नियमावली जाहीर

Archana Banage

खासदार उदयनराजेंची ती एन्ट्री वाऱयावरची वरात होती

Patil_p

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाताळ साध्या पध्दतीने साजरा करावा: जिल्हाधिकारी

Archana Banage

१७ तारखेला महाविकास आघाडीचा ‘हल्लाबोल मोर्चा’

Abhijeet Khandekar