Tarun Bharat

श्री सेवागिरी रथावर 30 लाख 56 हजार देणगी जमा

वार्ताहर/ पुसेगाव

कोरोनाच्या नियमावलीचे पालन करीत लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव ता खटाव येथील प पु श्री सेवागिरी महाराजांच्या 74 व्या पुण्यस्मरणानिमित्त शनिवार दि. 1 जानेवारी 2022 रोजी रथोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मोजक्याच भाविक-भक्तांनी मनोभावे श्री सेवागिरी महाराजांच्या रथावर 30 लाख 56 हजार 766 रुपये देणगी अर्पण केली, असल्याची माहिती श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन मोहनराव जाधव व सर्व विश्वस्तांनी दिली.गेल्या दोन वर्षपासून भक्तांच्या दानधर्मात वाढ झाल्याचे दिसून येते आहे. महाराष्ट्रासह व आंध्र, कर्नाटक गुजरात राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणार्या श्री सेवागिरी महाराजांच्या रथयात्रेत एका दिवशी रथावर एवढी प्रचंड मोठी देणगी जमा होणारे श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट हे धार्मिक स्थळ आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने श्री सेवागिरी महाराजांच्या रथ मिरवणुकीस परवानगी नाकारली. श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टने मंदिराच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते रथपूजन करूनच रथोत्सव साजरा केला. यावेळी भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या दोन हजार, पाचशे, शंभर, पन्नास, वीस, दहा रुपयांच्या नोटांच्या माळांनी रथ शृंगारला होता.3 लाख 41 हजार रुपयांच्या नोटा तर 15 हजार 670 रुपयांची नाणीं देणगी स्वरूपात दान केली.एकूण 3 लाख 56 हजार 766 रुपयांची रक्कम भाविकांनी मनोभावे दान केली. सायंकाळी रथावरुन नोटांच्या माळा एकत्र करुन संबंधित कमेटीने सर्व रक्कम श्री नारायणगिरी महाराज भक्त निवासात नेली. श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकार्यांच्या देखरेखीखाली विविध वित्त संस्थांचे अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थांच्या मदतीने रथावरील देणगीची सर्व रक्कम मोजण्यात आली. रात्री 11.30 वाजता प्रत्यक्ष देणगी रक्कम मोजण्यास प्रारंभ झाला. पहाटे 4 वाजता देणगी रक्कम मोजण्याचे काम पुर्ण झाले. 

Related Stories

रस्त्यावर केक कापणाऱया 16 जणांवर अटक

Patil_p

सातारा जिल्ह्याची ओळख अपघातमुक्त अशी निर्माण करु या – पोलीस अधीक्षक

Archana Banage

कराडात सहा तास हाय होल्टेज ड्रामा

Patil_p

राष्ट्रवादीच्या पॅनेलमध्ये इच्छूकांच्या याद्या तयार; पण जागेचा तिढा कायम

datta jadhav

कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात मिरजकर तिकटी येथे आंदोलन

Archana Banage

”थोडी जरी शिल्लक असेल तर केंद्राने देशाची जाहीर माफी मागावी”

Archana Banage