Tarun Bharat

सँडलवूड ड्रग्ज प्रकरण : बिनेश कोडियेरीच्या घरावर ईडीचा छापा

बेंगळूर/प्रतिनिधी

बेंगळूर येथील अंमलबजावणी संचालनालय (ईडी) च्या टीमने बुधवारी तिरुअनंतपुरममध्ये सीपीएमचे राज्य सचिव बाळकृष्णन कोडियेरी यांचा मुलगा बिनेश कोडियरी यांच्या घरी छापा टाकला. एनसीबीने बेंगळूरमध्ये अमली आणि मादक पदार्थांच्या आरोपाखाली अटक केलेल्या एका संशयितासह, बिनेश कोडियरी याला २९ ऑगस्ट रोजी अटक केली होती.

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस कर्मचार्‍यांनी बुधवारी बेंगळूर येथील येथील ईडी अधिकाऱ्यांच्या जवळपास सहा पथकांनी तिरुअनंतपुरममधील मारुथनकुझी येथे असणाऱ्या निवासस्थानी बुधवारी झाडा झडती घेतली.

बिनेश आता बेंगळूरमध्ये ईडीच्या ताब्यात आहे. मोहम्मद अनूप याच्याशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्याला ईडी कोठडीत घेण्यात आले होते. अनूपला पार्ट्यामध्ये ड्रग्ज पुरवण्यात आले होते. या माहितीवरून त्याला अटक केली होती.

एनसीबीच्या चौकशीत असे आढळले आहे की बिनेशने अनूपला बेंगळूरमध्ये हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली होती. योगायोगाने ऑगस्टमध्ये एनसीबीकडून त्याला अटक झाल्यानंतर बेंगळूर गुन्हे शाखेकडून कर्नाटकमधील उच्च स्तरीय कलाकार आणि चित्रपटातील व्यक्तींची ड्रगच्या वापरासंबंधी चौकशी सुरू झाली.

Related Stories

राज्यात प्राप्तिकरचे 30 ठिकाणी छापे

Patil_p

राजीव गांधींची चूक, भाजप सतर्क

Amit Kulkarni

वेळापत्रक न बदलता वर्ग पुन्हा सुरू होणार

Archana Banage

कर्नाटकात प्रत्येक जिल्ह्यात होणार गोशाळा

Archana Banage

कर्नाटकात सक्रिय रुग्णांची संख्या ६ लाखाहून अधिक

Archana Banage

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा नाही : मंत्री सुधाकर

Amit Kulkarni